Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो’ कुरिअर बॉय नव्हे तिचा मित्रच! कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

कोंढवा येथील उच्चभ्रु सोसायटीत घडलेल्या आयटी अभियंत्या तरुणीवरील अत्याचारप्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, 'तो' कुरिअर बॉय नव्हता तर तिचा मित्रच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2025 | 11:48 AM
"तो" कुरिअर बॉय नव्हे तिचा मित्रच! कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

"तो" कुरिअर बॉय नव्हे तिचा मित्रच! कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : कोंढवा येथील उच्चभ्रु सोसायटीत घडलेल्या आयटी अभियंत्या तरुणीवरील अत्याचारप्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, ‘तो’ कुरिअर बॉय नव्हता तर तिचा मित्रच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासोबतच तो घरात घुसला नसून, तो तिच्या सहमतीने घरी आला होता. तसेच, तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारलेला नसून, ती बेशुद्ध देखील झाली नव्हती, असेही समोर आले आहे. दरम्यान, तरुणीने नकार दिल्यानंतर देखील जबरदस्तीने बलात्कार केला, त्याचा तपास पुणे पोलिसाकंडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. कोंढव्यातील उच्चभ्रु सोसायटीतील २२ वर्षीय आयटी अभियंता तरुणीवर कुरिअर बॉय म्हणून आलेल्या एकाने बलात्कार केला. तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला व ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री समोर आली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. घरात घुसून बलात्कार झाल्याने शहरात याघटनेने खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी पुर्ण ताकदीने तपास करून या गुन्ह्याचे ४८ तासाच्या सत्य बाहेर आणले. त्यामध्ये तरुण कुरिअर बॉय नव्हता, तर तिचा मित्रच असल्याचे वास्तव समोर आले आहे.

तिनेच फोटो एडिट केले

तरुणीसोबत फोटो काढून त्यावर मी पुन्हा येईन, छान वाटले. कोणाला काही सांगितल्यास हा फोटो व्हायरल करेल असा मजकूर टाकण्यात आल्याचे तरुणीने तक्रारीत म्हंटले होते. तरुणीच्याच मोबाईलमध्ये हे फोटो काढल्याचेही तिचे म्हणणे होते. पोलिसांनी या सर्व गोष्टींचा तपास केल्यानंतर तरुणीने मुळ फोटो ‘एडिट’करून त्यावर हा मजकूर टाकला. तर मुळ फोटो पोलिसांना मोबाईल देताना डिलीट केल्याची माहिती देण्यात आली.

तो यापुर्वी आला होता..!

तरुणी व संबंधित तरुण एक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते एकाच समाजातील असून, त्यांची परिचय मेळाव्यात भेट झाली होती. नंतर त्यांच्यात मैत्री झाली. दरम्यान, तो तरुण यापुर्वीही तिच्या फ्लॅटवर आल्याचे समोर आले आहे. पण, कोणाला समजू नये, यासाठी तो ‘डिलीव्हरी बॉय’ अशी नोंद सोसायटीच्या वहीत करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने अनेकवेळा तिला ऑनलाईन खाद्यपदार्थ देखील ऑर्डर केले होते.

असे शोधले तरुणाला

डिलीव्हरी बॉय म्हणून उच्चभ्रु सोसायटीत घुसून तरुणीवर बलात्कार झाल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात होता. पुणे पोलिसांनी ताकदीने तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे २०० कर्मचारी, स्थानिक पोलिसांचे ३०० कर्मचारी अशे ५०० कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवस- रात्र करून जवळपास ७०० ते ८०० सीसीटीव्ही तपासले. त्यातून तरुण बाणेर भागात राहत असल्याचे समजले. त्यावरून त्याला पकडले

ती ओळखण्यास नकार देत होती

तरुणीला संशयित तरुणाचे फोटो दाखविले, पण ती हा नव्हे असे सांगत होती. परंतु, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून सर्व गोष्टी ‘क्लेअर’करून तरुणाला ताब्यात घेतले. तरुणीला जेंव्हा तरुण व त्याचा मोबाईल दाखविला, तेव्हा तिने ओळखले आणि घडलेला प्रकार मान्य केला. तो तिच्याशी बोलूनच तिच्या घरी आला होता. तसे मॅसेज व कॉल्स पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी संबंधित तरुण या सोसाटीत आला होता का, हे पाहण्यासाठी सर्व रहि‌वाशांचे जबाब नोंदवले होते.

संबंधित तरुण सातच्या सुमारास सोसायटीत आला आणि साडे आठच्या सुमारास बाहेर पडला असल्याचे दिसत आहे. तरुणीने रात्री दीडच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली. नंतर हा प्रकार समजला. तत्पुर्वी तरुणीला इन्स्टाला फॉलो करणारे व इतर मित्र, सहकारी अशा सर्वांकडे पोलिसांनी चौकशी केली होती.

बलात्काराचा तपास सुरू

तरुणीच्या म्हणण्यानुसार त्याने जबरदस्ती केली. त्यासंदंर्भाने पोलिसांकडून बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. स्प्रे किंवा डिलीव्हरी बॉय तसेच अश्लील फोटो व त्यावरील मजकूर हा तरुणीनेच रचलेला बनाव होता. त्यामुळे त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Shocking information has been revealed through the police investigation into the kondhwa case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली
1

भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तब्बल चार लाखांची रोकड पळवली

Cyber Crime : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने दोघांची फसवणूक; सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांना घातला गंडा
2

Cyber Crime : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने दोघांची फसवणूक; सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांना घातला गंडा

Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती
3

Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…
4

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.