नराधम सावज शोधतचं होता! पूर्णवेळ मास्क वापरला; स्वारगेट प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर
Pune Swargate Bus Depot News – पुणे/अक्षय फाटक : स्वारगेट बसस्थानकात ताई म्हणून तिला आपलेसे करून तरुणीवर अत्याचार करणारा नराधम बसस्थानकाच्या आवारात तब्बल दोन तास घुटमळत सावध शोधत होता, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या सीसीटीव्हीच्या पडताळणीत बसस्थानकात आरोपी हा सर्वत्र महिलांकडे विशेष करून एकट्या महिलांकडे फिरताना दिसून आला आहे. यामुळे तो सावज शोधत असल्याचे पोलिसांचे मत आहे. दरम्यान, आरोपी घटनेनंतर त्याच्या घरी गेला. नंतर तो तेथून पळाला आहे. त्याच्या याकृत्याबाबत कुटूंबियही अनभिज्ञ होते, असे समोर आले आहे. विशेष म्हणजे, त्याने पुर्ण घटनेत ‘मास्क’ वापरला असल्याचेही समोर आले आहे.
दत्तात्रय रामदास गाडे हा मुळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा आहे. तो विवाहत आहे. त्याला दोन मुले आहेत. परंतु, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच आहे. त्याच्यावर स्वारगेट पोलिसांत एक चोरीचा तसेच शिरूर व इतर पोलिसांत चैन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत. तो गुन्हेगारी मानसिकतेचाच आहे. दत्तात्रय फिरस्ता आहे. त्याचे कुटूंबियही त्याला कंटाळले आहेत. तो जास्त घरी नसतो, आला तर कधी येतो, अन्यथा येतही नाही. तो चोऱ्या-माऱ्या करत फिरतो. स्वारगेट बसस्थानक हा त्याचा सातत्याने फिरण्याचा परिसर असल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेवेळी तो जवळपास दोन तास स्वारगेट बसस्थानकात घुटमळत फिरत होता. तो सावज शोधत होता, असे त्याच्या वर्तनुकीतून दिसत आहे. महिलांकडेच त्याचे जास्त तर लक्ष होते, असेही सीसीटीव्हीत दिसत आहे.
नेमकं घडलं काय?
तरुणी स्थानकातील बेंचवर मोबाईल पाहत बसलेली होती. तिच्या शेजारी एक महिलाही होती. तेव्हा आरोपी तेथून पाहून गेला. तो परत पुन्हा आला. त्याने तरुणीशी बोलण्यास सुरूवात केली. तेव्हाच ती शेजारी बसलेली महिला निघून गेली. परंतु, आजू-बाजूला इतर प्रवासी होते. त्याने ‘ताई’ कुठे जायचे असे विचारले. त्यावर ती फलटण असे म्हणाली. मग, तो म्हणाला ती बस तिकडे उभी आहे. तेव्हा तरुणी परत पुन्हा म्हणाली की बस तर इथे लागते ना ? त्यावर आरोपीने मी, इथेच दहा वर्षे झाले काम करतोय. मी कंडक्टर आहे, असे म्हणाला नंतर ते दोघेही उठून बसकडे गेले. तेव्हा बसमध्ये अंधार होता, तरुणीने त्याला बसमध्ये तर अंधार आहे, अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने सांगितले बसमध्ये प्रवासी आहेत, लाईट बंद केलेली आहे. तू वर जाऊन पहा. तरुणीने बससमोरील पाटी न पाहताच बसमध्ये चढली. त्याचवेळी तोही चढला आणि त्याने बसचा दरवाजा लावून घेतला. तरुणीने आरडाओरडा करण्यापुर्वीच त्याने तिला “आवाज केलास तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. तसेच, तिच्यावर अत्याचार केला. नंतर दोघेही बसमधून खाली उतरले. आरोपी विरूद्ध दिशेने आणि पिडीत मुलगी दुसऱ्या दिशेने निघून गेली.
पिडीत तरुणीने ओळखले
आरोपी दत्तात्रय याने पुर्ण घटनेत मास्क वापरलेला आहे. त्यामुळे त्याची ओळख पटविणे कठीण होते. परंतु, पोलिसांनी त्याची ओळख पटवली आणि त्याचे घर दुपारी साधारण अडीचच्या सुमारास गाठले. तेव्हा तो घरी नव्हता. घरी विचारपूस करून खात्री केली. त्याचा फोटो व इतर माहिती घेतली. ती तरुणीला दाखविली. तिने आरोपीला ओळखले.
पोलिसांकडून शोध सुरु