crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याला आवार घालण्यासाठी नाशिक पोलिसांकडून प्रयत्न केले जात असतानाच पोलिसांनाही न जुमानता गुन्हे घडत आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात पंचवटी परिसरात सागर जाधव याच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी काही आरोपीना अटकही केली होती. जवळपास ११ आरोपी ताब्यात होते. मागील भांडणाचा राग मनात ठेवून सागर जाधव याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. पोलिसांनी संशयित आरोपींची चौकशी केली असता त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संभाजीनगरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; कारचा टायर फुटला, दोन तरुण…
धक्कदायक माहिती काय?
ती म्हणजे राज्यात सत्तेत असलेल्या भाजप पक्षातीलच माजी नगरसेवकानेच कट रचल्याच समोर आल आहे. जगदीश पाटील या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगितलं जातंय. नाशिकमधील निकम गँगचा म्होरक्या हा अमरावती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला एका जुन्या केससाठी नाशिकला आणल होत. मात्र एका खाजगी हॉटेलमध्ये जगदीश पाटील याने शेखर निकम याची भेट घेत त्याच्या गोळीबाराचा कट रचला आणि हॉटेलमध्येच हा प्लान करण्यात आला. त्या नंतर १७ तारखेला सागर जाधव वर गोळीबार करण्यात आला त्यात तो सध्या गंभीर जखमी आहे ..
गोळीबार कसा झाला ?
नाशिकमध्ये २०१७ मध्ये गैंगवॉर पेटल होते. त्यात नाशिकमध्ये किरण निकम याचा खून करण्यात आला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला. उघडे गैंगचा समर्थक सागर जाधव याच्यावर गोळीबार करण्याचा प्लान करण्यात आला. एका अंत्यविधिसाठी सागर जाधव येणार अशी माहिती होती. त्यातूनच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.
शेखर निकमवर आहे मोक्का
शेखर निकम हा किरण निकम यांच्यानंतर टोळी चालवत होता. सध्या तो मोक्याच्या गुन्ह्यात अमरावती कारागृहात आहे. त्याला एका जुन्या केस मध्ये नाशिकला आणण्यात आल होत त्यात त्याने माजी नगरसेवकसोबत प्लान केला.