एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. एका तरुणाने ओळख लपवून एका लहान मुलाच्या आईशी लग्न केले. तिला सत्य समजताच तरुणाने तिला बंदिस्त केले. तिच्यावर वर्षभर चार मित्रांसह सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
एक विवाहित महिला आपल्या मुलासोबत पतीचे घर सोडून निघून गेली होती. तिने दुसऱ्या समुदायातील एका तरुणाशी लग्न केले. त्या तरुणाने तिला आपली ओळख खोटी सांगितली आणि लग्न केले होते. जेव्हा तिला हे सत्य कळले तेव्हा त्या तरुणाने तिला बंदिस्त बनवून ठेवले. एक वर्ष तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. ४ मित्रांसह मिळून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
एक दिवस कशीबशी ती महिला आरोपींच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाली. तिने घडलेली सर्व घटना आपल्या आईला सांगितली. ती म्हणाली, “आई, आकाश नावाच्या तरुणाने माझ्याशी लग्न केले होते. पण लवकरच मला त्याची खरी ओळख कळली की त्याचे नाव आकाश नाही. तो दुसऱ्या समुदायाचा होता. त्यानंतर त्याने मला बंदिस्त बनवून घरात ठेवले. त्यानंतर त्याने आपल्या 4 मित्रांसह माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. वर्षभर माझ्यावर अत्याचार झाले. रोज माझ्यासोबत बलात्कार होत होता. मोठ्या मुश्किलीने मी त्यांच्या तावडीतून पळून आले आहे.”
पुढे महिलेने आपल्या आईला सांगितले,आकाश त्याचे खोटे नाव असून त्याचे नाव नौशाद असे आहे. तो तिला रोज जीवे मारण्याची धमकी देत होता. अनेकदा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ती यशस्वी होऊ शकली नाही.
दोन आरोपी अटक
पीडित महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर बाकीच्या आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, लवकरच त्यांनाही अटक केली जाईल. ही घटना मुरसान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
पीडितेच्या आईने काय म्हंटले
पीडितेच्या आईने सांगितले की, एक वर्षापूर्वी तिची मुलगी तिच्या मुलाला घेऊन घरातून कुठेतरी निघून गेली होती. तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा काही पत्ता लागला नव्हता. नुकतेच तिच्या मुलीने फोन करून सांगितले की, हाथरस गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश नावाच्या तरुणाने तिच्याशी लग्न केले. काही दिवसांनंतर तिला कळले की, त्याने खोट्या आधार कार्डाद्वारे तिच्याशी लग्न केले आहे. जेव्हा मुलीने सांगितले की तिला घरी परत जायचे आहे, तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने बंदिस्त बनवून ठेवले. त्यानंतर तिच्यावर दररोज सामूहिक बलात्कार केला जात होता. “आम्हाला आमच्या मुलीसाठी न्याय हवा आहे,” असे तिच्या आईने सांगितले.
Crime News: अकलुजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 13 गुन्हेगारांविरूध्द थेट MCOCA…