Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

लॉरेन्स बिश्णोई टोळीचा कुख्यात फरार सदस्य शुभम लोणकर हा महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. त्याला भारतात परत आणण्याचे आणि त्याचा साथीदार अर्जु बिश्णोई याचे जागतिक जाळे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2026 | 01:52 PM
एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

Follow Us
Follow Us:

मुंबई : लॉरेन्स बिश्नोई टोळीने महाराष्ट्रात देखील पाय रोवले आहेत. धक्कादायक म्हणजे, आता या टोळीकडून व्यापाऱ्यांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उकळण्यासारखे गंभीर प्रकार सुरू झाले आहेत. लॉरेन्स बिश्णोई टोळीचा कुख्यात फरार सदस्य शुभम लोणकर हा महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. अलीकडेच, काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना लोणकरकडून सलग सहावी धमकी मिळाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने आमदाराची सुरक्षा ‘वाय-प्लस’ पर्यंत वाढवली आहे. विधानसभेतील या गदारोळाने गुन्हेगारी जगताचा एक नवीन चेहरा पुन्हा समोर आणला आहे.

 

पुण्यातील एका डेअरीमधून चालविले नेटवर्क

परदेशातून परतल्यानंतर, लोणकरने आपला भाऊ प्रवीणसोबत पुण्यात एक डेअरी दुकान चालवायला सुरुवात केली. या दुकानाच्या नावाखाली त्याने व्यावसायिक, राजकारणी आणि चित्रपट कलाकारांचे एक मोठे जाळे तयार केले. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, १९९० च्या दशकात अंडरवर्ल्डच्या ऱ्हासानंतर मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडवर राज्य करणे हे लोणकरचे ध्येय होते. लोणकरने माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्याकांडातील शूटर शिवकुमार गौतमला ‘धर्म’ आणि ‘राष्ट्रवाद’ या नावाखाली चिथावले होते.

सैन्याच्या इच्छेपासून ते गुन्हेगारीपर्यंत गाठली मजल

शुभम लोणकरला एकेकाळी देशाची सेवा करण्यासाठी भारतीय सैन्यात भरती व्हायचे होते. २०१८-१९ मध्ये जैसलमेर येथे सैन्य भरती परीक्षेत अपयशी ठरल्यानंतर, तो ‘बजरा’ नावाच्या एका व्यक्तीला भेटला. देशभक्तीच्या नावाखाली लोणकरचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले आणि तो बिश्णोई टोळीत सामील झाला. टोळीने त्याला औपचारिक शस्त्र प्रशिक्षणासाठी नेपाळ आणि अझरबैजानला पाठवले.

हे सुद्धा वाचा : अंबड तालुक्यात भरधाव एसटी बसेस एकमेकांना धडकल्या; जखमींचा आकडाही समोर

आरोपीचे प्रत्यार्पण अवघड

अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण, बाबा सिद्दिकी हत्याकांड आणि रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील आरोपी शुभम लोणकर नेपाळमार्गे भारतातून पळून गेला असून, सध्या आग्नेय आशियाई देशांमध्ये लपून बसला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, तो अशा देशात आहे, ज्याच्यासोबत भारताचा प्रत्यार्पण करार नाही. सध्या, केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने, त्याला भारतात परत आणण्याचे आणि त्याचा साथीदार अर्जु बिश्णोई याचे जागतिक जाळे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : पोह्यात आळी अन् भातात सापडले झुरळ, अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; कँटीन परवाना केला निलंबित

Web Title: Shubham lonkar a gangster from the bishnoi gang is still absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • crime news
  • Lawrence Bishnoi
  • Shubham Lonkar

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.