Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात भावंडांवर टोळक्याचा हल्ला, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारण…

पुण्यातील धानोरीत वैमनस्यातून टोळक्याने भावंडांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टोळक्यावर गु्न्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 27, 2025 | 06:24 PM
पुण्यात भावंडांवर टोळक्याचा हल्ला, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारण...

पुण्यात भावंडांवर टोळक्याचा हल्ला, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारण...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, दररोज राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील धानोरीत वैमनस्यातून टोळक्याने भावंडांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टोळक्यावर गु्न्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे.

पंकज कुमार आणि साहू कुमार (दोघेही रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश राधेश्याम गुप्ता (वय ४०, रा. धानोरी) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार नितीन गुप्ता (वय २५), आकाश गुप्ता (वय १९) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राहुल कुमार गौतम (वय २३ रा. मुंजाबावस्ती ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पंकजकुमार आणि आरोपी गुप्ता यांच्यात काही दिवसांपुर्वी वादविवाद झाले होते. त्याचा राग गुप्ता कुटुंबीयांत होता. शुक्रवारी (२५ एप्रिल) रात्री गुप्ता यांनी पंकजवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यावेळी पंकजचा भाऊ साहूने भांडणात मध्यस्थी केली. टोळक्याने त्याच्यावरही शस्त्राने वार केले. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पंकजकुमार व त्याचा भाऊ साहू हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे तपास करत आहेत.

प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर हल्ला

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणास नग्न करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सौरभ भरमा कांबळे (वय २४, रा. निढोरी, ता. कागल) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन कांबळे याच्याविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Siblings beaten up by a gang in punes dhanori

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • pune crime case
  • Pune Police Action
  • Pune Police News

संबंधित बातम्या

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
1

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण
2

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती
3

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
4

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.