
एकाच झाडाला लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह, भांगेत भरलं होतं कुंकु; परिसरात खळबळ
सदर घटना ही घटना नेमिषारण्यातील खेवटा रामपूर गावात घडली आहे. इथे २१ वर्षीय प्रेयवंशचे गावातील १७ वर्षांच्या रजनीसोबत प्रेमप्रकरण सुरु होतं. दोघांच्या प्रेमाप्रकरणावरुन कुटुंबिय नाराज होते. अशातच रजनीच्या कुटुंबियांनी तिच्या मनाविरुद्ध तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. फ्रेब्रुवारी महिन्यात रजनीचा तिळक समोरंभ पार पडला तर नोव्हेंबरमध्ये तिचा विवाह होणार होता. दुसरीकडे प्रेयवंश आणि रजनी शुक्रवारी कुणालाही न कळवता संध्याकाळी घराबाहेर पडले. रात्रीपर्यंत दोघेही घरी न परतल्याने दोन्ही कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. कुटुंबीय शोध घेत असतानाच त्यांना गावाबाहेर ५०० मीटर दूर एका शेतात झाडावर एकाच ओढणीला लटलेले दोघांचे शव आढळले.
रजनी आणि प्रेयवंश यांना फासाला लटकलेले पाहून दोन्ही कुटुंबियांना धक्का बसला. पोलिस घटनास्ठळी पोहचताच त्यांनी दोघांच्या मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणासंबंधित बोलताना पोलिसांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारावरच घटनेचा पुढील तपास केला जाईल. प्राथमिक तपासात फाशी घेतल्याचे समोर येते पण शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतरच मृत्येचे खरे कारण स्पष्ट होईल.
घटनेतील मुख्य गोष्ट म्हणजे गळफास घेतलेल्या प्रेमीयुगलाचे शव खाली उतरवल्यानंतर प्रेयसीच्या भांगेत कुंकु भरल्याचे आढळले. घटनेपूर्वी प्रियकरानेच तिच्या भांगेत हे कुंकु भरल्याची शंका वर्तवली जात आहे. पोलिस तपासात झाडाखाली कुंकवाची डब्बी आणि टिकलीचे एक पानही आढळले ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.