(फोटो सौजन्य: X)
अपहरणाचा खोटा दावा
बहसूमाच्या रामराजमध्ये राहणाऱ्या ७ वर्षीय मुलाला अपहरण करुन मारल्याची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी या घटनेत मीरापुरमधील रहिवासी अर्पित पराशरला संशयावरुन अटक केली. पुढे जाऊन खुलासा झाला की अर्पितसोबत आई गुरप्रीत काैरचे अनैतिक संबंध सुरु आहेत. काही दिवसांआधीच मुलगा अंगदवीरने दोघांना रंगेहात पकडलं होते. आई गुरप्रीत आणि प्रियकर अर्पित यांनी भिती होती की अंगदवीर कुटुंबाला त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती देईल. म्हणूनच स्वत: आईनेच मुलाला मारण्याची सुपारी प्रियकराला दिली. अर्पितने प्रथम मुलाचे अपहरण केले आणि नंतर त्याची हत्या केली.
नस कापली
अर्पित एका बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत होता. पोलिसांच्या चाैकशीत त्याने कबूल केले की, मुलाला मारण्यासाठी त्याने अंगदवीरचे तोंड पगडीने दाबले आणि नंतर चाकूच्या मदतीने त्याच्या हातावरची नस कापली. आरोपी इथेच थांबला नाही तर यानंतर त्याने मुलाचा गळाही आवळला. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाला शेतात फेकून दिले. पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेतलं असून आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
नवऱ्यासोबत हवा होता घटस्फोट
आरोपी आई गुरप्रीत सिंहने पोलिसांना सांगितले की, तिला पति गुरसेवक सिंहसोबत घटस्फोट हवा होता. गुरसेवक सिंह साैदी अरेबीयात नोकरी करत असून तिने अनेकदा पतीकडे घटस्फोटाची मागणी केली होती. परंतु नवऱ्याने प्रत्येकवेळी यासाठी नकार दिला. ती बऱ्याच काळापासून आपल्या माहेरच्या घरी राहत होती आणि इथेच तिचे अर्पितसोबत प्रेमप्रकरण सुरु झाले.






