Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: नावरच्या धमकीनंतर स्नेहाने संपवलं आयुष्य, लग्न झाल्यावर स्वयंपाक येत नसल्यावरुन जाच नंतर हुंड्यासाठी धमकी

सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव स्नेहा विशाल झेंडगे (वय 27) असे आहे. ती पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहत होती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 11, 2025 | 09:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव स्नेहा विशाल झेंडगे (वय 27) असे आहे. रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आला तर जीवे मारुन टाकू, अशी धमकी नवऱ्याने स्नेहाला दिली होती. त्यानंतर तिने आत्महत्या केली. ती पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहत होती.

Virar Crime: अंगात चार भुतं, तुला बाळ होणार नाही,तुझा पती…; भूत काढण्याच्या बहाण्याने अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुण्यातील आंबेगाव पठार येथील राहत्या घरी गळफास घेत स्नेहाने आपले जीवन संपवले. याबाबत माहिती देताना स्नेहाचे वडील कैलास सावंत म्हणाले की, आम्ही झेंडगे कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे मुलीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर काही महिने झेंडगे कुटुंबीय मोहोळला राहत होते, नंतर ते पुण्यात राहायला आले. आम्ही स्नेहाचा नवरा विशाल याच्या मागणीप्रमाणे शेतजमीन घेण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये दिले. झेंडगे कुटुंबीय पुण्यात कुठे राहायला आले आहेत, हे त्यांनी आम्हाला सांगितले नव्हते. झेंडगे यांची वेळू येथे कंपनी आहे. स्नेहाचे भाऊ कंपनीत गेले होते, त्यावेळी त्यांना हाकलून देण्यात आले, असे स्नेहाच्या वडिलांनी सांगितले.

आधी स्वयंपाक येत नसल्यावरून जाच नंतर

स्नेहा आणि विशालचे लग्न गेल्यावर्षी झाले होते. लग्नानंतर काही दिवस स्नेहाचे आयुष्य सुरळीत चालले, मात्र लवकरच सासरकडून त्रास सुरु झाला. सुरवातीला स्नेहाला स्वयंपाक नीट येत नाही, असे सांगून त्रास दिला जायचा. नंतर पती व कुटुंबीयांनी कंपनी सुरू करण्यासाठी तब्बल 20 लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम आणून द्यावी म्हणून स्नेहावर वेळोवेळी दबाव आणला जाऊ लागला. पैसे मिळवण्यासाठी केवळ मानसिक छळच नव्हे तर मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारची वागणूक दिली जात होती. या सगळ्याला कंटाळून स्नेहाने यापूर्वी पोलिसांत एक गुन्हा दाखल केला होता. मात्र, सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन तो गुन्हा मागे घेण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे स्नेहाचे मानसिक तणाव अधिकच वाढले. सातत्याने होणारा छळ, आर्थिक मागणी आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे ती पूर्णपणे खचली. अखेर 9 ऑगस्ट 2025 रोजी घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले.

गुन्हा दाखल

स्नेहाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी स्नेहा झेंडगे हिचा नवरा विशाल, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे आणि दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढे पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Nagpur Accident: नागपुरात भीषण अपघात! रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू

Web Title: Sneha ended her life after being threatened by her husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
2

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
4

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.