Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इमारतीवरून उडी मारून सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; सोबत असलेलं 6 महिन्यांचं बाळ सुखरूप

दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर ईशा गंभीर मानसिक तणावात होती. तिला गेल्या अनेक दिवसांपासून झोप न येण्याचा त्रास होता. त्यामुळे तिची प्रकृती बिघडत गेली. याच तणावातून तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज सध्या लावला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 14, 2026 | 08:37 AM
इमारतीवरून उडी मारून सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; सोबत असलेलं 6 महिन्यांचं बाळ सुखरूप

इमारतीवरून उडी मारून सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या; सोबत असलेलं 6 महिन्यांचं बाळ सुखरूप

Follow Us
Follow Us:

हैदराबाद : हैदराबादच्या मियापूर परिसरात एका ३७ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या ६ महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या भीषण घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर बालक चमत्कारिकरीत्या बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच अपार्टमेंटमधील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. महिला गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर बाळ जिवंत होते. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

ईशा साहू (वय ३७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होत्या आणि आपल्या पतीसह व कुटुंबासोबत मियापूर येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहत होत्या. ईशा आणि त्यांचे पती दोघेही खासगी क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली. प्राथमिक तपासात समोर आले की, दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर ईशा गंभीर मानसिक तणावात होती. तिला गेल्या अनेक दिवसांपासून झोप न येण्याचा त्रास होता. त्यामुळे तिची प्रकृती बिघडत गेली. याच तणावातून तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज सध्या लावला जात आहे. मात्र, पोलिसांकडून आता सर्व बाबींची शक्यता लक्षात घेऊन तपास केला जात आहे.

दरम्यान, सायबराबाद पोलिसांनुसार, महिलेने ६ महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन इमारतीवरून उडी मारली. खाली पडत असताना बाळ तिच्या हातांतून सुटले आणि कुंपणावर पडले. कुंपणावर पडल्यामुळे बाळाला गंभीर दुखापत होण्यापासून संरक्षण मिळाले. सध्या बाळ धोक्याबाहेर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

पुण्यातही आयटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, हिंजवडीतील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या प्रकरणाने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सततचा मानसिक छळ, खोट्या तक्रारी आणि कामाच्या ठिकाणी होणारा अपमान यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख संबंधित कर्मचाऱ्याने सुसाइड नोटमध्ये केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीसह टीसीएसमधील दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालमत्तेच्या वादातून भररस्त्यात मुलानेच केली बापाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् नंतर…

Web Title: Software engineer commits suicide by jumping off a building

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Hyderabad Crime
  • Suicide case

संबंधित बातम्या

‘शेतात जाऊन येतो…’ म्हटलेला शेतकरी परतलाच नाही; विष प्राशन करून संपवलं जीवन
1

‘शेतात जाऊन येतो…’ म्हटलेला शेतकरी परतलाच नाही; विष प्राशन करून संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.