मालमत्तेच्या वादातून भररस्त्यात मुलानेच केली बापाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् नंतर...
छत्रपती संभाजीनगर : मालमत्तेच्या वादात न्यायालयाने घराचा ताबा वृद्ध आई-वडिलांच्या बाजूने देण्याचा आदेश दिला; मात्र याचाच राग मनात धरून पोटच्या मुलाने केवळ एका तासाच्या आत 84 वर्षीय वृद्ध वडिलांना धारदार शस्त्राने वार करून संपवले. ही घटना छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरातील अबरार कॉलनी येथे घडली आहे.
जाफर कमरुद्दीन पटेल सय्यद (वय ८४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी मुलगा अब्दुल रहेमान अब्दुल जाफर याला अवघ्या दीड तासात बेड्या ठोकल्या आहेत. मृत जाफर सय्यद हे जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पत्नी, चार मुली आणि तीन मुलगे असा मोठा परिवार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांचा एक मुलगा अब्दुल रहेमान हा मालमत्तेसाठी आपल्या वृद्ध आई-वडिलांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. त्याने काही काळापूर्वी आई-वडिलांना बळजबरीने घराबाहेर काढून संपूर्ण घराचा ताबा स्वतःकडे घेतला होता.
दरम्यान, आपल्या हक्काच्या घरासाठी जाफर सय्यद यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने जाफर सय्यद आणि त्यांच्या पत्नीला घराचा ताबा परत देण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा आदेश येऊन तासाभर उलटत नाही तोच मुलाने आपल्या वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जाफर सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला.
जन्मदात्या आईने मुलाला संपवलं
दुसऱ्या एका घटनेत, उत्तर प्रदेशातील मेरठच्या मुंडाली भागातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे आईच पोटच्या मुलाच्या जीवावर उठली आणि तिने केवळ ७ महिन्यांच्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केली. मुख्य म्हणजे हे प्रकरण फक्त मुलाच्या हत्येचे नसून यात आता मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या तपासात हे उघड झाले आहे की, आई मीनाक्षीवर फक्त मुलाच्या हत्येचा आरोप नाही तर कुटुंबाच्या खूनाचा कट रचल्याचा आरोपही तिच्यावर लावण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रकरणाला सखोल तपास केला जात आहे.
धाराशिव तालुक्यातील खून प्रकरणातील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकत केली कारवाई






