
पिंपरी-चिंचवड हादरलं! 18 व्या मजल्यावरुन आईने मुलासह मारली उडी; घटना CCTV मध्ये कैद
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनोज भांगड (वय ३५) हे येरवडा येथील एका आयटी कंपनीत नोकरी करतात. ते पत्नी एकता आणि मुलगा माधव यांच्यासह सिग्नेचर पार्क, डांगे चौक येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावर मागील दोन वर्षांपासून वास्तव्यास होते. हे कुटुंब मूळचे राजस्थान येथील आहे.
शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मनोज हे नेहमीप्रमाणे कामावर येरवडा येथे गेले होते. त्यावेळी पत्नी एकता आणि मुलगा माधव हे दोघेही घरी होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीच्या डक्टमध्ये आवाज झाल्याने रहिवाशांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले. त्यावेळी महिला आणि मुलगा खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. नागरिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, महिला आपल्या मुलासह लिफ्टने १८ व्या मजल्यावर गेल्याचे दिसून आले. तेथे त्यांनी चप्पल काढून ठेवल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यानंतर दोघेही खाली पडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दोघांचे मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठविले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, पंचनामा आणि अन्य तपासाची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मृत महिलेच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. पोलिसांना चिट्ठी आढळून आली असून दुर्धर आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे. तसेच मुलाला माझी खूप आठवण येईल म्हणून मुलालाही सोबत नेते असे नमूद आहे. या घटनेने वाकड, डांगे चौक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Ans: ही घटना पिंपरी चिंचवडमधील डांगे चौक येथील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. महिलेने १८ व्या मजल्यावरून उडी मारली.
Ans: पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात महिलेने दुर्धर आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. तसेच "मुलाला माझी खूप आठवण येईल म्हणून मुलालाही सोबत नेते" असेही तिने नमूद केले आहे.
Ans: मृतांचे नाव एकता मनोज भांगड (वय ३३) आणि मुलगा माधव (वय ६) आहे. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे असून गेल्या दोन वर्षांपासून सिग्नेचर पार्कच्या ७ व्या मजल्यावर राहत होते. पती मनोज भांगड येरवडा येथील आयटी कंपनीत नोकरी करतात.