
crime (फोटो सौजन्य: social media)
• मोहोळजवळ सोलापूर–पुणे महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात
• पनवेलहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेले सर्व प्रवासी मित्र
• कार झाडावर आदळली; 5 ठार, 1 महिला गंभीर जखमी
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सोलापूर- पुणे महामार्गावर मोहोळ जवळील देवडी पाटीजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला जखमी झाली आहे.
कसा झाला अपघात?
पनवेलहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी काही लोक एरटीका कार (MH-46 Z 4536) याने निघाले होते. शनिवारी रात्री १२ च्या सुमारास वाहन चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जोरदार आढळली. यामुळे अपघात झाला. यावेळी कार मध्ये एकूण सहा प्रवासी होते. त्यातून तीन पुरुष तर तीन महिला होते. अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला प्रवासी जखमी झाली. जखमी महिलेस तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार रस्त्यापासून अंदाजे 10 ते 15 फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकलेले होते.मोहोळ पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु होतं. जखमी झालेल्या महिलेची नाव ज्योती जयदास टकले (वय 37 वर्षे रा. सेक्टर न 13 पनवेल) असे आहे. तर एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघातात मृत झालेल्यांची नावे
1) माला रवी साळवे वय 40 वर्षे राहणार पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 न्यू पनवेल
2) अर्चना तुकाराम भंडारे वय 47 वर्षे सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्ट
3) विशाल नरेंद्र भोसले वय 41 वर्षे राहणार आरबीआय एम एस ओ रूम नंबर 8 रेल्वे कॉलनी पनवेल स्टेशन जवळ पनवेल
4) अमर पाटील ,खारघर
5) आनंद माळी.
UP Crime: प्रेमविवाहाचा भयंकर शेवट; चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या
Ans: सोलापूर–पुणे महामार्गावर मोहोळजवळ देवडी पाटीजवळ शनिवारी मध्यरात्री.
Ans: भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन झाडावर आदळले.
Ans: 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 महिला जखमी आहे.