Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: पतीसोबत वाद झाला अन्…; 14 वर्षीय मुलीला घेऊन आईची रेल्वेसमोर उडी, दोघींचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूरमध्ये पतीसोबत झालेल्या वादानंतर 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षीय मुलीसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. दोघींचे मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आले. बेपत्ता तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरू केला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 27, 2026 | 01:06 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पतीसोबत वाद झाल्यानंतर 33 वर्षीय महिलेने 14 वर्षीय मुलीसह घर सोडले.
  • दोघींचे मृतदेह सोलापूर-टिकेकरवाडी रेल्वेमार्गावरील रुळाजवळ आढळले.
  • बेपत्ता तक्रारीनंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली; प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीशी वाद झाला आणि विवाहित महिलेने आपल्या १४ वर्षाच्या मुलीसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. घडलेली घटना सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच महिला राहत असलेल्या शहरातील सुशीलनगर परिसरात शोककळा पसरली.

काय घडलं नेमकं?

वर्षा पांडुरंग अधटराव (वय ३३ वर्षे) आणि स्वरा पांडुरंग अधटराव (वय १४ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मायलेकींनी नावे आहेत. त्या सुशीलनगर परिसरात राहत होत्या. वर्षा या स्वराला घेऊन घरातून रागात बाहेर पडल्या. शनिवारी रात्री त्या उशिरा घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्या पतीने त्यांचा अनेख ठिकाणी शोध घेतला मात्र त्या दोघीही कुठेच सापडल्या नाही. त्यामुळे पतीने पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता रात्रभर शोध घेतल्यानंतर रविवारी पहाटे रेल्वे रुळावर झालेल्या अपघाताबद्दल पोलिसांना माहिती मिळाली.

Mumbai Crime: फेसबुकवर झाली मैत्री, शेअर केले खासगी व्हिडिओ; मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ, 1.35 लाखांची फसवणूक

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिथे वर्ष आणि स्वरा या दोघी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पतीच्या छळाला कंटाळली; 10 महिन्यांच्या मुलीची हत्या करून आई थेट मृतदेह खांद्यावर घेऊन पोलीस ठाण्यात

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच १० महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ६ वर्षाच्या मोठ्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस, अशी आर्त हाक आणि विनवणी मुलीने करताच तिचा जीव वाचला. महिलेने हे टोकाचे पाऊल पतीच्या छळाला कंटाळून उचलल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यांनतर महिला चिमुलीला खांद्यावर घेऊन थेट पोलिस ठाण्यात हजर झाली. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत घडली आहे. आरोपी महिलेचे नाव पूजा योगेश खुर्दामळे (वय 26) असे आहे. पूजाने आपल्या पतीच्या छळाला कंटाळून आपल्या १० महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली. तिचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारले. मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव शक्ती असे आहे.

पत्नी विभक्त झाली, पती रात्री मुलांना भेटण्यासाठी गेला अन्…; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणाऱ्या मायलेकींची नावे काय आहेत?

    Ans: वर्षा अधटराव आणि स्वरा अधटराव.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूरच्या विजापूर रोड परिसरात.

  • Que: प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचे कारण काय?

    Ans: पतीसोबत झालेला वाद.

Web Title: Solapur crime argument with husband leads to tragedy mother jumps in front of a train with her 14 year old daughter both die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
2

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब
3

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.