Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: प्रेयसीच्या पतीला फोन करून बोलावलं अन् कोयत्याने संपवलं; सोलापुरात प्रेमप्रकरणातून थरारक हत्याकांड

सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. सिद्धाराम कैलास कटप असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी संतोष पाटील याने त्याला भेटायला बोलावून हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 20, 2026 | 03:09 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेयसीच्या पतीचा कोयत्याने हल्ला करून खून केल्याचा आरोप.
  • हल्ल्यात सिद्धाराम कटपचा जागीच मृत्यू, भावजी गंभीर जखमी.
  • एमआयडीसी पोलिसांनी आरोपी संतोष पाटीलला अटक केली.
सोलापूर: सोलापूर शहरात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. प्रेयसीच्या पतीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, मध्यस्थी करण्यासाठी गेलेला त्याचा भावजीही गंभीर जखमी झाला आहे.

काय घडलं नेमकं?

सिद्धाराम कैलास कटप (वय 20, रा. आकाशवाणी केंद्र, सोलापूर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिद्धाराम हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तर आरोपीचा नाव संतोष महादेव पाटील (वय 19, रा. कलावती नगर) असे आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी संतोष पाटील याचे सिद्धारामच्या पत्नीसोबत विवाहपूर्व प्रेमसंबंध होते. याच कारणावरून शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आरोपी संतोषने सिद्धारामला फोन करून अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीसमोर भेटायला बोलावले. तिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी संतोषने सोबत आणलेल्या कोयत्याने सिद्धारामवर थेट हल्ला चढवला.

मध्यस्थीकरण्यावर देखील केले वार

सिद्धारामवर एकापाठोपाठ एक सपासप वार केले. हे वार इतके भीषण होते की सिद्धाराम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी सिद्धराम आणि आरोपी संतोष या दोघांचा वाद सोडवण्यासाठी आणि सिद्धारामला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे भावजी प्रमोद पाटील यांच्यावरही आरोपीने कोयत्याने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: इंस्टाग्रामवर ओळख, कैफमध्ये भेटायला बोलावलं, अत्याचार केले आणि…

आरोपी अटकेत

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी आपल्या फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि काही वेळातच मुख्य आरोपी संतोष पाटील याला बेड्या ठोकल्या. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आम्ही फोनवर बोलत होतो तेव्हा…

मृत सिद्धारामच्या बहिणीने सांगितले की रात्री सिद्धाराम हा त्याच्या पत्नीशी फोनवर बोलत होता. पत्नीने फोन लाऊड स्पीकरवर ठेवल्यामुळे घरातील सर्वजण त्याचा आवाज ऐकत होते. बोलत असतानाच अचानक सिद्धाराम जोरात विव्हळल्याचा आवाज फोनमधून आला आणि त्याच क्षणी त्याच्यासोबत काहीतरी घातपात झाल्याची जाणीव आम्हाला झाली.

घरातील कर्ता पुरुष

​मृत सिद्धाराम कटप हा अत्यंत गरीब परिस्थितीमधून पुढे आलेला तरुण होता. कष्टाने रिक्षा चालवून तो कुटुंबाला हातभार लावत होता. अवघ्या एक वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. सिद्धारामच्या पश्चात आई, दोन बहिणी आणि पत्नी असा परिवार आहे. सिद्धरामचे वडील घराकडे येत असताना दुचाकीला कुत्रा आडवा गेला आणि भीषण अपघात झाला होता. यामध्ये त्यांचे निधन होऊन वर्षभर होण्याच्या आधीच मुलाची देखील दुर्दैवी हत्या झाली. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने कटप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​ Uttar Pradesh : एकाच झाडाला लटकलेले आढळले प्रेमीयुगुलाचे मृतदेह, भांगेत भरलं होतं कुंकु; परिसरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव सिद्धाराम कैलास कटप असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

  • Que: हत्या कशातून झाल्याचा आरोप आहे?

    Ans: आरोपीचे मृताच्या पत्नीशी विवाहपूर्व प्रेमसंबंध होते आणि त्यातून झालेल्या वादातून हत्या झाल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: एमआयडीसी पोलिसांनी आरोपी संतोष पाटीलला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Solapur crime beloveds wifes phone call me call me solapurat premprakaratun murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
2

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.