crime (फोटो सौजन्य: social media)
राज्यातून घरफोडीचे अनेक गुन्हे समोर येत आहे. आता सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. घरफोडीच्या उद्देशाने ‘चड्डी गँग’ पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान ही टोळी वेगवेगळ्या भागांमध्ये संशयास्पद हालचाली करतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर शहरातील वसंत विहार, थोबडे नगर, स्वराज्य विहार, गुलमोहर सोसायटी या परिसरांमध्ये चार संशयित तरुण घरफोडीच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आलं आहे. या चौघांनी चेहऱ्यावर कापड बांधलेले असून काळा टी-शर्ट आणि केवळ चड्डी परिधान केलेली होतो. त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारं सामान देखील असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलं आहे. यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास चार चोर चेहऱ्याला कपडा पूर्णपणे बांधून काळा टी-शर्ट आणि चड्डीवर फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारे काही साहित्य असल्याचे स्पष्ठपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. या गंगाकडून घरांची पाहणी करून नंतर चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी दाराच्या बाहेर असलेल्या वस्तू हलविल्या गेल्याचंही निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ पावलं उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.
सोलापूर शहर पोलीस या चड्डी गँगचा शोध घेत आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने माजवली दहशत, ‘आम्हीच इथले भाई’ म्हणत १० ते १२ वाहनांची केली तोडफोड
पुण्यातून सतत गुन्हेगारी घटना समोर येत आहे. किरकोळ कारणावरून हत्या, हाणामारी, कोयत्याने दहशत माजवल्याचा प्रकार समोर येत आहे. आता पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून कोयते उपसत तरुणांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. आम्हीच इथले भाई म्हणत तरुणांच्या जमावाने 10-12 गाड्या देखील फोडले आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.