अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अकोला जिल्हा कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई अकोल्यातल्या एमआयडीसी भागात व्हि.जे क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर करण्यात आली आहे. या ठिकाणी उपस्थित कर्मचारी व मजूरवर्गाकडून मुदत बाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नवीन स्टीकर लावणे, अशाप्रकारचं कामकाज सुरू होतं. गुन्हा दाखल करण्यात आला असून 21 लाख 95 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, उत्पादनस्थळावरून 8 कीटकनाशकेचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तर या तपासणीचा अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे. ही कारवाई अकोला जिल्हा कृषी विभागाच्या पथकाने केली असून या प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड
दरम्यान, अशाच एक प्रकार भिवंडीतून समोर आला आहे. बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत कारखान्याचा भांडाफोड केला आहे. अमूल बटर बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. तिथे दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने शांतीनगर पोलिसांच्या मदतीने गुरुवारी १७ जुलैला करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरामध्ये बनावट अमूल बटरचे उत्पादन चालू असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष सिरोसिया यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी करणे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक काळू गवारे व पथकातील पोलिसांसह नागाव भागातील भुसावळ कंपाऊंड, कासिमपुरा एका कारखान्यावर धाड टाकली. त्याठिकाणी अमूल कंपनीचे 100 ग्रॅम तसेच 500 ग्रॅम वजनाचे बनावट बटर तयार करण्यात येत असल्याचे आढळले.
तिथे रिफाईंड पामोलिन तेल, रिफाईंड वनस्पती तेल, मीठ, तसेच बटर फ्लेवर टाकून हँड मिक्सर मशीनचा वापर करून बनावट बटर तयार करण्यात येत होते. त्याठिकाणी त्यावेळी जीशान मुस्ताक अन्सारी व मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद अक्रम हे दोघे हा बनावट बटर बनवत होते. अन्नसुरक्षा अधिकारी करणे यांनी तेथील साहित्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन, त्याठिकाण हून एकूण 180 पाकिटे सह रिफाइंड पामुलीन तेलाचा 73.4 किलो तसेच वनस्पती तेलाचा 73.4 किलो साठा जप्त केलेला आहे.
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने माजवली दहशत; ‘आम्हीच इथले भाई’ म्हणत १० ते १२ वाहनांची केली तोडफोड