बीडमधून सतत गुन्हेगारी वृत्त समोर येत आहे. अत्याचार, मारहाण, हाणामारी, हत्या अश्या अनेक प्रकार सतत समोर येत आहे. त्यामुळे बीडचं बिहार होत आहे का? कायदा सुव्यवस्था उरली नाही आहे की नाही? असे सवाल देखील अनेक वेळा विचारण्यात आले आहे. आता बीडच्या आष्टी तालुक्यातून गुन्हेगारी घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तीन तरुणांनी मिळून एका तरुणाला अमानुष मारहाण केली. एव्हडेच नाही तर मारहाण करतांना त्याच्या अंगावर चटके दिल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने माजवली दहशत; ‘आम्हीच इथले भाई’ म्हणत १० ते १२ वाहनांची केली तोडफोड
नेमकं काय घडलं?
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाघळूज गावात ही घटना घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव संतोष राठोड असं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील तिघेजण संतोष कडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होते. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिला. आणि त्याच रागातून आरोपींनी संतोषला बेदम मारहाण केली आणि चटके दिले. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतोष राठोड याने अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. याप्रकारनंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाले त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे गावात भीतीच वातावरण पसरलं आहे.
प्रेयसीच्या घरी जाणे बेतले जीवावर; बेदम मारहाणीत २१ वर्षीय तरुणांचा मृत्यू
दरम्यान, बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. प्रेम संबंधातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे शिवम काशिनाथ चिकणे (२१ वर्ष) असे आहे. तो अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमचे गावामधीलचं एका मुली सोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीने घरी बोलावले असतांना त्यावेळी अचानक नातेवाईक तेथे आले आणि त्याच्यात वाद झाला. दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शिवमला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.