Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: ‘तुला जिवंत राहू देणार नाही’; सततच्या धमक्या, बेदम मारहाण… हातावर आरोपींची नावे लिहित 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात प्रेमसंबंधाच्या संशयातून 21 वर्षीय आरीम पठाण याला वारंवार मारहाण, अपमान आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सततच्या मानसिक छळाला कंटाळून त्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 30, 2026 | 10:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंधाच्या संशयातून आरीम पठाणला सार्वजनिक ठिकाणी बेल्ट, काठी आणि चपलेने मारहाण करण्यात आली होती.
  • आरोपींनी वारंवार घरात जाऊन “गावात राहू देणार नाही” आणि “जिवंत ठेवणार नाही” अशा धमक्या दिल्याचा आरोप आहे.
  • आत्महत्येनंतर सुसाईड नोट आणि हातावरील लिखाणाच्या आधारे चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोलपूर: सोलापूर येथून एक संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका २१ वर्षीय तरुणाला वारंवार बेदम मारहाण आणि सततच्या धमक्या देत मानसिक त्रास देण्यात आल्याचे समोर आले आहे. या छळाला कंटाळून अखेर या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट आणि हातावर आरोपींची नावे लिहून ठेवली.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील आरोपींची नावे आरीम राजुद्दीन पठाण (वय 21, रा. पिंपरी आर, ता. बार्शी) असे आहे. आरीमचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांना होता. याच संशयातून 10 मे रोजी आरोपींनी आरीमला गौडगाव येथील नागोबा चौकात अडवले आणि तेथे त्याला मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्याला पिंपरी (आर) येथील संबंधित महिलेच्या घरासमोर आणले. तिथे सर्व लोकांसमोर त्याला बेल्ट, काठी आणि चपलेने बेदम मारहाण केले. यावेळी आरीमचा मोबाईल फोनही आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला.

या मारहाणीनंतर देखील आरोपींचा छळ थांबला नाही. आरोपींनी ११ मे, १६ मे आणि २६ मे रोजी थेट आरीमच्या घरात घुसून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमकावले. “तुला गावात राहू देणार नाही, तुला जिवंत जगू देणार नाही आणि तुझे लग्नही होऊ देणार नाही,” अश्या धमक्या आरोपींनी आरिमला दिल्या होत्या. या सातत्याच्या धमक्यांमुळे आणि झालेल्या अपमानामुळे आरीम प्रचंड मानसिक तणावाखाली होता.

२६ मेला पुन्हा आरीमला धमकी मिळाली, या धमकीनंतर तो प्रचंड नैराश्यात होता. 27 मे रोजी पहाटे 1 ते 4 वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आरीमने आत्महत्या केली. सकाळी कुटुंबियांनी शोध घेतला तेव्हा ही बाब लक्षात आली. त्याला तातडीने बार्शी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

तळहातावर लिहून ठेवले आरोपींची नावे

आत्महत्या करण्यापूर्वी आरीमने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. एवढेच नाही तर आपल्या डाव्या हाताच्या तळहातावर काही मजकूर लिहून ठेवला होता. पोलिसांना त्याच्या खिशात सुसाईड नोट सापडली. भाऊ हमराज पठाण यांच्या फिर्यादीवरून आणि सुसाईड नोटच्या आधारे वैराग पोलिसांनी संबंधित चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वैराग पोलीस करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संतापाचा वातावरण आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आणि वय किती होते?

    Ans: आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आरीम राजुद्दीन पठाण असून त्याचे वय 21 वर्षे होते.

  • Que: आरीमने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले?

    Ans: कथित प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेली मारहाण, सार्वजनिक अपमान, सततच्या धमक्या आणि मानसिक छळ यामुळे तो नैराश्यात गेला होता.

  • Que: पोलिसांना कोणते महत्त्वाचे पुरावे मिळाले?

    Ans: आरीमच्या खिशात सुसाईड नोट सापडली तसेच त्याने आपल्या हाताच्या तळहातावर आरोपींची नावे आणि काही मजकूर लिहून ठेवला होता, ज्याच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Solapur crime i wont let you live constant threats brutal beatings 21 year old youth commits suicide after writing the names of his tormentors on his hand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
2

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
3

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
4

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.