Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime News: शेतजमिनीच्या वादातून 55 वर्षीय शेतकऱ्याची तलवारीने हत्या; सख्ख्या भावानेच केला सपासप वार

सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द येथे शेतजमिनीच्या वादातून 55 वर्षीय शेतकरी संजय नागनाथ शिंदे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात गेलेल्या संजय शिंदे यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सख्खे भाऊ आणि त्यांच्या मुलांवर संशय व्यक्त करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2026 | 08:10 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या झाल्याचा आरोप.
  • संजय शिंदे यांच्यावर तलवारीने हल्ला केल्याची माहिती.
  • पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनीच ५५ वर्षीय शेतकऱ्यावर सपासप वार करत संपवले. घडलेली घटना कामती खुर्द परिसरातली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Solapur Crime)

काय घडलं नेमकं?

संजय नागनाथ शिंदे (५५) असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी संजय शिंदे हे दुचाकीने आपल्या शेतात गेले होते. तिथे शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. हा हल्ला इतका जोरदार होता की संजय शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. असा आरोप मृतकाच्या मुलाने केला आहे. (Solapur Crime)

अ‍ॅनेस्थेशियाचा ओव्हरडोज घेत नागपुरात डॉक्टरची आत्महत्या; रात्री ड्युटी केली अन् सकाळी जीवन संपवलं

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. (Solapur Crime) या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संजय शिंदे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावाने आणि पुतण्याने मिळून आपल्याच भावावर कोयत्याने आणि लोखंडी रॉडने भीषण प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. डोक्यावर तब्बल ७ ते ८ वार करण्यात आले आहे. यात महादेव जाधव हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा हल्ला जुन्या कौटुंबिक वादातून झाला आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाधववाडी येथील रहिवासी महादेव जाधव आणि त्यांच्या सख्ख्या भावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून आरोपी भाऊ आणि पुतण्याने मिळून महादेव जाधव यांच्यावर हल्ला चढवला. काही समजण्याच्या आतच दोघांनी मिळून महादेव यांच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, आरोपींनी थेट महादेव यांच्या डोक्यावर वार केले. तब्बल ७ ते ८ गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यांनंतर महादेव जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने करकंब येथील ‘जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सायबर चोरट्यांनी हद्दच पार केली! बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा घेतला; वडिलांना व्हिडिओ कॉल केला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव काय आहे?

    Ans: मृत शेतकऱ्याचे नाव संजय नागनाथ शिंदे (वय 55) असे आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द परिसरात घडली.

  • Que: हत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: शेतजमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक आरोप आहे.

Web Title: Solapur crime news 55 year old farmer hacked to death with a sword over a land dispute own brother inflicted multiple blows

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
2

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
4

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.