
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
पृथ्वीराज खारे यांच्या विहिरीवरील विद्युत पुरवठा नादुरुस्त झाल्याने त्यांनी विद्युत कंपनीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने विद्युत कर्मचारी सीताराम लोखंडे हे फिर्यादीच्या शेतातील डीपी जवळ येऊन त्यांना बोलावून घेतलं. दोघेजण त्या ठिकाणी गेले असता, आमची विद्युत मंडळाकडे तक्रार का केली? असे म्हणत दोघां भावांना कोयता, काठी, दगड व लाथाबुक्क्याने मारहाण केली.
मारहाणीनंतर पृथ्वीराज किसन खारे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अंकुश भानुदास खारे, अमोल खारे, आदित्य खारे, सोन्या उर्फ अक्षय अरुण खारे व संतोष भानुदास खारे सर्व राहणार पंढरपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.
बाप नाही हैवान! पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलले; काळीज पिळवटून टाकणारी घटना
करमाळा तालुक्यातील हिंगणी गावात शनिवारी (दि. १०) घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वडिलांनीच आपल्या दोन अल्पवयीन मुलांना शेतातील विहिरीत ढकलल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सुहास जाधव (वय ३२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास सुहास जाधव हे आपल्या मालकीच्या शेतात गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली मुले शिवांश जाधव आणि श्रेया जाधव (दोघेही वय ८) यांना शेतातील विहिरीजवळ नेऊन त्यांना विहिरीत ढकलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विहिरीत पडल्यानंतर दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर सुहास जाधव हे घटनास्थळावरून फरार झाले होते.
Beed Crime: शेतातील पाणीवाटपाच्या वादातून 9 वर्षांच्या चुलत भावाची हत्या; मुख्य आरोपीला जन्मठेप
Ans: विद्युत मंडळाकडे केलेली तक्रार.
Ans: पृथ्वीराज खारे व युवराज खारे.
Ans: होय, 6-7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.