काय नेमकं प्रकरण?
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावात अनिकेत गित्ते आणि अतुल गित्ते यांची शेती शेजारी असून पाणी देण्यासाठी वापरली जाणारी पाइपलाईन सामायिक होती. याच कारणावरून दोन्ही कुटुंबामध्ये वारंवार वाद होत होते. १५ डिसेंबर २०१८ रोजी हा वाद टोकाला गेला. अतुल गित्ते याने कट रचला आणि आपल्या चुलत भावाचा सुती दोरीने गळा आवळून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरातील पाण्याच्या हौदात उभा करून ठेवण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घट्नातशाली दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आणि गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले असून फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच वैद्यकीय तज्ज्ञांची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली. अखेर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करत आरोपी अतुल गित्ते याला दोषी ठरवले. भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपी अतुल गित्ते याला जन्मठेपेची शिक्षा सुनावत 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी रवी वैजनाथ गित्ते (24), वैजनाथ रंगनाथ गित्ते (50) आणि आशाबाई वैजनाथ गित्ते (45) या तिघांना प्रत्येकी तीन वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
Ans: शेतातील पाणीपुरवठ्याच्या वादातून.
Ans: मुख्य आरोपीला जन्मठेप व दंड, इतर तिघांना सक्तमजुरी.
Ans: प्रत्यक्षदर्शी व वैद्यकीय साक्ष.






