Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: ‘खेळताना पडला’ म्हणणाऱ्या काकाचाच निघाला खुनी चेहरा; 5 वर्षीय चिमुकल्याची गळा दाबून हत्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावात सख्ख्या काकानेच 5 वर्षीय पुतण्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “पत्र्यावरून पडला” असा बनाव करणाऱ्या आरोपी काकाचा भांडाफोड शवविच्छेदन अहवालातून झाला. मंद्रूप पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 07, 2026 | 01:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बरूर गावात 5 वर्षीय समर्थ कास्तारची संशयास्पद मृत्यू प्रकरणी हत्या उघड.
  • “खेळताना पडला” असा काकाने खोटा बनाव केला होता.
  • शवविच्छेदन अहवालानंतर आरोपी काका अंकुश कास्तारला अटक.
सोलापूर: दक्षिण सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम काकानेच आपल्या अवघ्या ५ वर्षांच्या सख्ख्या पुतण्याला संपवल्याचे समोर आले आहे. आधी आरोपी काकाने खेळतांना पडून मृत्यू झाल्याचे बनाव रचले होते. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर काकाच बिंग फुटलं. पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावात घडली. मात्र काकानेच एवढे टोकाचे पाऊल का उचलले? चला जाणून घेऊ या…

नेमकं काय घडलं?

समर्थ यल्लाप्पा कास्ता असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर आरोपी काकाचे नाव अंकुश परसप्पा कास्तार असे आहे. समर्थचे आई-वडील दोघेही ऊसतोड कामगार आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ते सतत बाहेरगावी असतात. त्यामुळे समर्थ हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथील आपल्या आजीजवळ राहत होता. 4 जूनला दुपारी १ वाजताच्या सुमारास समर्थ हा मी खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर गेला. काहीवेळाने समर्थचे काका अंकुशने समर्थने बेशुद्धावस्थेत घरी आणले. त्याने समर्थ खेळताना पत्र्यावरून खाली पडला आणि त्यामुळे तो बेशुद्ध झाला आहे, असे सांगितले.

Jalna Crime: ‘पोहता येत नाही’ माहिती असूनही पाण्यात उतरवलं; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मृत्यू

नातेवाईकांनी तातडीने त्याला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. समर्थच मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्याला, गळ्यावर आणि हनुवटीवर काही संशयास्पद दुखापतीच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदन अहवालात समर्थचा मृत्यू पत्र्यावरून पडल्याने नाही, तर त्याला गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.

पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता संशयित आरोपी काका अंकुश कास्तार याला अटक केली आहे. त्याने समर्थची हत्या का केली? या मागेच कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे. मंद्रूप पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Nagpur Crime: NEET विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर नवा ट्विस्ट; सुसाईड नोटवरून पोलिसांच्याच भूमिकेवर संशय

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत चिमुकल्याचे नाव काय होते?

    Ans: मृत चिमुकल्याचे नाव समर्थ यल्लाप्पा कास्तार होते.

  • Que: आरोपीने सुरुवातीला काय कारण सांगितले होते?

    Ans: समर्थ पत्र्यावरून पडल्याने बेशुद्ध झाल्याचा बनाव आरोपीने केला होता.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कधी अटक केली?

    Ans: शवविच्छेदन अहवालात हत्या स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: Solapur crime uncle who claimed the child fell while playing turns out to be the killer 5 year old boy strangled to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
2

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
3

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
4

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.