काय घडलं नेमकं?
२० मे रोजी आकांक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करून एनडीए (NTA) आणि सरकारवर टीका केली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता, पोलिसांनी “अशी कोणतीही सुसाईड नोट आमच्याकडे नाही, ती असल्यास चतुर्वेदी कुटुंबाने पोलिसांकडे सुपूर्द करावी,” अशी तोंडी माहिती दिली होती. चार जूनपर्यंत पोलिसांनी हाच दावा केला होता.
मात्र आता ही सुसाईड नोट पहिल्याच दिवसापासून तपास अधिकारी निखिल तव्हाणे यांच्याकडे होती. त्यांनी स्टेशन डायरीमध्ये आणि आत्महत्येशी संबंधित कागदपत्रांमध्ये या सुसाईड नोटची नोंदच केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी हयगय केल्याचा आरोप करत निखिल तव्हाणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
व्हिडिओ व्हायरल
आकांक्षाच्या नातेवाईकांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आकांक्षाने २० मे रोजी टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्याच दिवशी तिची सुसाईड नोट खोलीतील एका टेबलावर सापडल्याचा आणि त्याच दिवशी आकांशाच्या कुटुंबीयांनी टी सुसाईड नोट पहिल्याच दावा केला आहे. मात्र आपल्या लेकीच्या आत्महत्येमुळे गोंधळून गेलेल्या कुटुंबीयांनी ती सुसाईड नोट त्याच दिवशी पोलिसांच्या स्वाधीन केली नव्हती, असा खुलासा ही आकांक्षाचे चुलत बंधू या व्हायरल व्हिडिओमध्ये करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 20 मे रोजी ही घटना घडलेली असताना अनेक दिवस आकांक्षाची सुसाईड नोट समोर का येऊ शकली नाही? ती नागपूर पोलिसांनी लपवून ठेवली की आकांक्षाच्या कुटुंबीयांनीच ती पोलिसांना उशिरा स्वाधीन केली? या बद्दलचे गूढ अधिकच वाढले आहे. आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ans: आकांक्षाने 20 मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
Ans: : सुसाईड नोटची नोंद न करता ती लपवून ठेवल्याचा आरोप पोलिसांवर झाला आहे..
Ans: तपास अधिकारी निखिल तव्हाणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.






