Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस…; झोपलेल्या तरुणावर चाकूने सपासप वार, तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात अनैतिक संबंधांच्या संशयातून 27 वर्षीय युवराज व्यवहारे यांची मध्यरात्री चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. घरासमोरील अंगणात झोपलेल्या युवराजवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासांत चार आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2026 | 10:15 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची हत्या केल्याचा आरोप.
  • अंगणात झोपलेल्या युवराज व्यवहारे यांच्यावर चाकूने हल्ला.
  • पोलिसांनी 12 तासांत चार आरोपींना अटक केली.
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण झोपेत असतांना मध्यरात्री त्याच्यावर हल्ला चढवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. “तू आमच्या मुलींची छेड काढतोस, आणि आता आमच्या घरातील महिलांच्याही पाठीमागे लागला आहेस,” असा आरोप करत त्याच्यावर हल्ला चढवण्यात आला आहे. घडलेली घटना मोहोळ तालुक्यातील एका गावात सोमवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

युवराज अशोक व्यवहारे (वय २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. युवराज हा दोन वर्षांपूर्वी वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याची एका महिलेशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले असा संशय महिलेच्या नातेवाईकांना होता. यावरून पूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. हा वाद पोलीस ठाण्यात आपापसात मिटवण्यात आला.

Raigad Crime: वाद विकोपाला गेला अन्… प्रियकराने प्रेयसीचा घेतला जीव, गळफास घेत स्वतःलाही संपवलं

मात्र सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास युवराज आपल्या घरासमोरील अंगणात झोपला असतांना आरोपींना तिथे येऊन गाठले. “तू आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस,” असे म्हणून शिवीगाळ करत आरोपींपैकी दोघांनी युवराजवर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात युवराज गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

चार आरोपी अटकेत

या प्रकरणी युवराजचे वडील अशोक निवृत्ती व्यवहारे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत १२ तासांच्या आत चार आरोपींना अटक केली. दत्ता अण्णा पवार, प्रशांत बाळू शिंदे, अण्णा हरिदास पवार, अंबिका अण्णा पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत.

मुख्याध्यापकाने पत्नी-मुलांना विष पाजून केली आत्महत्या; 22 पानांची सुसाईड नोट सापडली

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलो आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने आपल्या दोन मुलांना आणि पत्नीला विष पाजून स्वतः आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी मुख्याध्यापकाने २२ पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांना सापडली आहे. शेअर मार्केटच्या नादाला लागून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात गुरुवारी घडली.

Jalna Crime: ‘त्या मला मारून टाकतील’ भीती ठरली खरी? पत्नी आणि चार मुलींनी मिळून वडिलांची केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: युवराज अशोक व्यवहारे असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका गावात ही घटना घडली.

  • Que: पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?

    Ans: या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Solapur crime youve been pestering our women sleeping youth stabbed repeatedly dies on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
3

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब
4

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.