Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: बार्शी सत्र न्यायालयाचा निर्णय, उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडला जामीन

बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाडला बार्शी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. संशयावरून गुंतवणूक व सुसाईड नोट नसल्याचे वकिलांनी न्यायालयात मांडले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 25, 2025 | 10:06 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गोविंद बर्गे यांनी पूजाच्या घराजवळ कारमध्ये आत्महत्या केली होती.
  • प्रेमसंबंध बिघडल्यामुळे तणाव वाढल्याची माहिती.
  • न्यायालयाने “फक्त संशयावरून अटक” असल्याचे मान्य करत जामीन मंजूर केला.
बीड: बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी ९ सप्टेंबर रोजी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील घरासमोर आपल्या गाडीत रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून नाव समोर आल्याने पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ती जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. अखेर तिच्या जामीन अर्जावर सोमवारी बार्शी सत्र न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला.

न्यायालयीन युक्तिवाद
पूजा गायकवाडच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान तिचे वकील अॅड. धनंजय माने यांनी न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की, पूजाला फक्त संशयाच्या आधारे या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी गोविंद बर्गे यांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. तसेच पोलिस तपास जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आरोपी महिलेला कारागृहात ठेवण्यात काहीही तथ्य किंवा लाभ नाही, असे त्यांनी न्यायालयाला पटवून दिले. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने पूजा गायकवाडला जामीन मंजूर केला.

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! निवडणूक खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, विवाहितेचा गळफास

नेमकं नातं आणि कारण काय?
गोविंद बर्गे यांना तमाशा कला पाहण्याची आवड होती. ते विविध कला केंद्रांना भेट देत असत. सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांची भेट थापडीतांडा येथील कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाडशी झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. गोविंद नियमितपणे पूजाला भेटण्यासाठी पारगाव केंद्रावर जात होते. या नात्यातून पूजा गायकवाडने त्यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोन्याचे दागिने तसेच तिच्या नातेवाईकांच्या नावावर काही जमीन करून घेतली होती.

मात्र, काही महिन्यांपासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. पूजा गायकवाडने गोविंद यांच्याशी बोलणे बंद केले. इतकेच नाही, तर तिने गोविंद यांच्यावर घर आणि शेती आपल्या नावे करण्याचा दबाव टाकल्याचे समोर आले. मागण्या मान्य न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादींकडून करण्यात आला आहे. या सर्वामुळे मानसिक तणावात आलेल्या गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

९ सप्टेंबरच्या रात्री ते पूजाच्या घराबाहेर आले. त्यानंतर त्यांनी कार आतून लॉक करून स्वतःवर गोळी झाडली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोविंद बर्गे कुठल्या जिल्ह्यातील होते?

    Ans: बीड

  • Que: पूजाला जामीन कुठल्या न्यायालयाने दिला?

    Ans: बार्शी

  • Que: गोविंद बर्गेने काय करून आत्महत्या केली?

    Ans: गोळी

Web Title: Solapur crimebarshi sessions court decides grants bail to dancer pooja gaikwad in upasarpanch govind barge suicide case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • Beed Crime
  • crime
  • Solapur

संबंधित बातम्या

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील
1

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली
2

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत
3

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PGमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या; आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत

Pune Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; मिक्सरच्या वायरने गळा आवळून पती थेट पोलीस ठाण्यात
4

Pune Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; मिक्सरच्या वायरने गळा आवळून पती थेट पोलीस ठाण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.