
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
सुहास ज्ञानदेव जाधव (वय 32) असे करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील रहिवासी आहे. ते वीज वितरण कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्याला शिवांश सुहास जाधव आणि श्रेया सुहास जाधव असे दोन सात वर्षाचे मुले आहे. घरात किरकोळ कारणावरून वाद झाला याच वादातून सुहास संतापला. त्याने रागाच्या भरात दोन्ही मुलांना हिंगणी (ता. करमाळा) येथील शेतात नेले. तेथे असलेल्या विहिरीत त्याने दोघांनाही ढकलून दिले. या घटनेनंतर काही वेळाने सुहास जाधव याने स्वतःच घरी फोन करून हा प्रकार सांगितला. त्यांनतर त्याला पश्चाताप झाल्याने त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
नातेवाईकांना माहिती मिळताच कुटुंबीय आणि नातेवाईक घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत विहिरीतील पाण्यात बुडून दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. जुळ्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याचे पाहून कुटुंबीयांनी टाहो फोडला. या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी सुहासला ताब्यात घेऊन उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आपल्या जुळ्या मुलांची हत्या करण्यामागचे नेमके कारण काय? याचा देखील तपास पोलीस करत आहे. या घटनेने करमाळा तालुक्यात शोककळा पसरली आहे.
Ans: दोन्ही जुळी मुले सात वर्षांची होती.
Ans: घरगुती वादातून रागाच्या भरात ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Ans: आरोपीने विष प्राशन केले असून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.