CRIME (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आता सोलापुरात देखील सासरच्या त्रासाला कंटाळून आशाराणी भोसले या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात देखील चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठीच सुनेचा छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथे ही घटना घडली. विवाहितेच्या आत्महत्त्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन हत्यांनी यवतमाळ हादरलं! भरदिवसा युवकाचा चाकूने खून, संशयातून पतीकडून पत्नीची तलवारीने हत्या
तीन वर्षांची चिमुकली मुलगी
मृत महिलेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हंटले आहे की सासरचं सासरच्या मंडळींनी पैसे आणि चार चाकी वाहनासाठी छळ केल्यानेचं मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलादांनी दिली आहे . मृत आशाराणी भोसले हिला अवघ्या तीन वर्षाची मुलगी असुन ती दुसऱ्यांदा गर्भवती होती. तीच लग्न २०१९ साली मोहोळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी विवाह झाला होता. तर आशाराणीची बहीण उशाराणी हिचा विवाह देखील पवन भोसले याच्या भावासोबत ज्ञानेश्वर सोबत झाला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आशाराणी हिचा नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासासाठी माहेरहुन पैसे आण म्हणून मारहाण करत होता. सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येतं नाही, मुलाला इज्जत देतं नाही असे म्हणत मानसिक छळ करतं होते. 2024 मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणं सुरूच होते. त्यामुळेच मुलगी आशाराणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपिंना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीमधील आशाराणी पवन भोसले (वय 22) हिने राहत्या घरातील दरवाज्याच्या चौकटीला साडी बांधून गळफास घेतला आहे. प्रथम ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात नवरा पवन भोसले याला अटक करण्यात आली असून सासू अलका आणि सासरा बलभीम अद्याप फरार आहे. जो पर्यंत आरोपींना अटक होतं नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबियांची भूमिका आहे.
पुण्यातील ‘या’ भागात चोरट्यांनी घरे फोडली; तब्बल लाखो रुपयांचा ऐवज चोरला