crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
सोलापूर: सोलापुरातून हत्येची घटना समोर आली आहे. दारू प्यायला पैसे न दिल्याने संतापाच्या भरात एका तरुणाची डोक्यावर कुऱ्हाडीने वार केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १ येथे घडली आहे.मृतकाचे नाव यतिराज दयानंद शंके (३५) असे आहे. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदला आहे. आकाश ळजाराम बलरामवाले, नवल खरे असे गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत. यातील मयत यतिराज याचे आणि आरोपीचे शेजारी घरे आहेत. आरोपींची मायाताकडे दारूसाठी पैसे मागितले आणि त्याला नकार दिल्याचे हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
पहाटे रुग्णालयात नेण्यात आलं
मिळालेल्या माहितीनुसार, मृत यतिराज याचे आणि आरोपींचं शेजारी घरं आहे. आरोपींनी मयताकडे दारूसाठी पैसे मागितले आणि त्याला नकार दिल्यानं हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मयत आणि आरोपींची झोपडपट्टीत भांडणे सुरू होती. आरोपी मयताला हाताने व लाथाबुक्याने मारहाण करीत होते. यातील आकाश बलरामवाले याने घरात जाऊन कुऱ्हाड घेऊन आला आणि त्याने मयताच्या डोक्यावर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने फिर्यादी व मयताचा मित्र वीरेश रामपुरे यांनी उपचारासाठी शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास शासकीय रुग्णालयामध्ये नेले. डॉक्टरांनी औषधोपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.
याप्रकरणी आरोपींची नवे आकाश तुळजाराम बलरामवाले, नवल खरे असे नाव आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे. याप्रकरणी तापस सुरु आहे.
चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या, सोलापूर येथील घटना
सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृत महिलेचं नाव यशोदा सुहास सिद्धगणेश, तर आरोपीचं नाव सुहास तुकाराम सिद्धगणेश असं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.