crime (फोटो सौजन्य - pinterest)
इटावा शहरातील बाजारिया येथील जॉली हॉटेलमध्ये १०१ क्रमांकाच्या खोलीत राहण्याऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. मृतकाचे नाव मोहित कुमार (३३) असे आहे. तो औरैया येथील रहिवासी होता. पोलिसांनी मृत देह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून तपास सुरु केला आहे. जीव देण्यापूर्वी त्यांने व्हिडिओ कॉल केला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हॉटेलमध्ये गोंधळ उडाला आहे.
नृत्यांगणास गुलाबाचे फुल दिले अन्…; लावणी कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मोहितीच मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हॉटेल मधून मोहितच्या मोबाईल, लॅपटॉप हस्तगत करून त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. मोहितच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. त्याने हा टोकाचा पाऊल का उचलला याचा तपास पोलीस करत आहे.
सूत्रांची माहिती काय?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित कुमार हा मार्केटिंगमध्ये काम करतो. मोहित कुमार गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये थांबला होता. दोन दिवस हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा असल्याचे त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितले होते. शुक्रवारी दिवसभर त्याच्या खोलीत हॉटेल कर्मचाऱ्यांना कोणतीही हालचाल दिसून आली नाही. रात्री ९ वाजताच्या सुमारास हॉटेल कर्मचारी आशिष यादव यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा फोन बंद आढळला. हॉटेलच्या लोकांना संशय आल्यावर त्यांनी मोहितच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कर्मचाऱ्यांनी दरवाजा जबरदस्तीने तोडला, तेव्हा त्यांना समोरचं दृश्य पाहून मोठा धक्का बसला. समोर मोहित बेडशीटच्या साहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल केल्याची माहिती
आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. तांत्रिक तपासणीनंतरच याची पृष्टि करता येईल.त्याने कोणाला व्हिडीओ कॉल केला होता, हे आता पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मोहित हा मानसिक तणावाखाली होता का किंवा तो कोणत्याही प्रकारच्या फसवणूक, धमकी किंवा इतर कोणत्याही समस्येत सामील होता का, त्याने कोणाला व्हिडीओकॉल केला होता. हे आता पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.