नोएडामध्ये तरुणाची आत्महत्या (फोटो- istockphoto)
दिल्लीत एका तरुणाने केली आत्महत्या
पोलिस करत आहेत तपास
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. ग्रेटर नोएडा येथे एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे आपला जीव इतका स्वस्त झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रेटर नोएडा येथे एका ट्रेनी डॉक्टरने आपले जीवन संपवले आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. या प्रकरणात नेमके काय घडले हे जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा भागात एक ट्रेनी डॉक्टरने आपले जीवन संपवले आहे. इमारतीमधून उडी मारून त्याने आत्महत्या केली आहे. ट्रेनी डॉक्टरने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासणीसाठी पाठवला आहे.
हा तरुण वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेत होता. तरुणाने 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याने हे पाऊल उचलले तेव्हा त्याचे आई-वडील घरातच असल्याचे समोर आले आहे. मात्र तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण सापडू शकले नाही. कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
प्रेमात अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या
एका तरुणाला त्याच्या प्रेमामध्ये अपयश आले. त्यामुळे त्याने 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. प्रेमप्रकरणात अपयश आल्याने तरुणाने आपले जीवन संपवले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इश्क है या दर्द? प्रेमप्रकरणात अपयशी तरुण 11 व्या मजल्यावर गेला अन्…; वाचा मन सुन्न करणारी घटना
प्रेम ही एक निर्मळ भावना आहे. खरे प्रेम मिळणे ही आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. मात्र तेच प्रेम न मिळाले नाही तर आपल्याला अतीव दु:ख होते. काही जण यातून सावरतात. तर काही जण चुकीचे पाऊल उचलतात. अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. एका तरुणाने आपले जीवन संपवले आहे. प्रेमामध्ये अपयश आल्यामुळे तरुणाने आपले जीवन संपवले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, ते जाणून घेऊयात
दरम्यानया तरुणाने 11 व्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिला आहे. हा तरुण 11 व्या मजल्यावरून उडी मारत असल्याचे कळताच त्या ठिकाणी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास तास हे बचावकार्य सुरू असल्याचे समोर आले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नाना यश आले नाही.