Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला, पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप; वडिलांचा विषारी कट उघड

मुंबईतील वडाळ्यात २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आणि सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, शवविच्छेदनात मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. दुसऱ्या लग्नावरून घरात वाद होता का? पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 09, 2026 | 02:44 PM
Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला, पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप; वडिलांचा विषारी कट उघड

Mumbai Crime News: दुसऱ्या लग्नाला विरोध केला, पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप; वडिलांचा विषारी कट उघड

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने मुलीची हत्या केल्याचा वडिलांवर आरोप.
  • विषमिश्रित बिर्याणी आणि गळा आवळल्याचा पोलिसांचा संशय.
  • पोस्टमार्टम अहवालानंतर आरोपी वडिलांना अटक.
 

मुंबई : वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने २० वर्षीय मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. शरीफ रझा हुसेन खान (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुलीला विषमिश्रित चिकन बिर्याणी खाऊ घालून त्यानंतर गळा आवळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा बनाव रचण्यात आल्याचे तपासात समोर आले. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासाच्या आधारे वडाळा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दुसऱ्या लग्नावरून घरात वाद

शरीफ खान हा व्यवसायाने कार्पेंटर असून वडाळा पूर्वेतील मॅडोना कॉलनी परिसरात राहतो. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याच्या पत्नीचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यानंतर तो आपल्या तीन मुलांसह राहत होता. रिफत (२०), नुझत (१६) आणि अहमद (१०) अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. पत्नीच्या निधनानंतर शरीफला दुसरे लग्न करायचे होते. मात्र, त्याच्या दोन्ही मुलींना या लग्नाला विरोध होता. याच कारणावरून घरात वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादातून आरोपीने दोन्ही मुलींना लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा: Crime News: भाईंदरच्या बारमध्ये पोलिसांचा छापा!  २६ जण ताब्यात, तब्बल १० तरुणी …

चिकन बिर्याणीत विष मिसळल्याचा आरोप

२ ऑक्टोबरच्या रात्री शरीफ खानने घरी चिकन बिर्याणी आणली. या बिर्याणीत विषारी पदार्थ मिसळून त्याने रिफतला खाऊ घातल्याचा आरोप आहे. त्याच रात्री लहान मुलगी नुझत उकाडा होत असल्याने मावशीच्या घरी झोपायला गेली होती. त्यामुळे ती घरी नसल्याने तिचा जीव वाचल्याचे सांगितले जाते. बिर्याणी खाल्ल्यानंतर रिफत बेशुद्ध झाल्याचे समोर आले. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आरोपीवर आहे. या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि विषारी पदार्थाचा वापर याबाबत तपास यंत्रणा पुरावे तपासत आहेत.

अन्नातून विषबाधा झाल्याचा बनाव?

३ ऑक्टोबरच्या पहाटे सुमारे पाच वाजता शरीफ खान नातेवाइकांकडे गेला. रिफत प्रतिसाद देत नसल्याचे सांगून तिला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला. नातेवाइकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रकरणाचे गांभीर्य आणि मृत्यूची संशयास्पद परिस्थिती लक्षात घेऊन रिफतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. केईएम रुग्णालयातील शवविच्छेदनादरम्यान तिच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळल्याचे सांगितले जाते. तिचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे निष्कर्ष समोर आल्यानंतर तपासाला वेग आला.

हेही वाचा: जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

पोस्टमार्टम अहवालानंतर वडिलांना अटक

शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासातील निष्कर्षांच्या आधारे वडाळा पोलिसांनी शरीफ खान याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे. या प्रकरणात विषारी पदार्थाचा वापर, हत्या करण्यामागील हेतू आणि घटनेशी संबंधित अन्य पुरावे यांचा पोलीस तपास करत आहेत. दुसऱ्या लग्नाच्या वादातून पोटच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Wadala father arrested daughter murder second marriage dispute sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Mumbai Crime case
  • Mumbai Murder Case

संबंधित बातम्या

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
1

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Crime News: इंस्टाग्रामवर मैत्री, मग भेटीगाठी… अन् निर्जनस्थळी तरुणाची हत्या; वर्षभराचा सूड उघड
2

Crime News: इंस्टाग्रामवर मैत्री, मग भेटीगाठी… अन् निर्जनस्थळी तरुणाची हत्या; वर्षभराचा सूड उघड

अपघाताच्या पडद्याआड हत्येचा डाव? तेजिंदर मृत्यूप्रकरणात मैत्रिणीला अटक; ‘सुपारी’च्या चर्चेने खळबळ
3

अपघाताच्या पडद्याआड हत्येचा डाव? तेजिंदर मृत्यूप्रकरणात मैत्रिणीला अटक; ‘सुपारी’च्या चर्चेने खळबळ

जळगावच्या लोंणजे गावातील घटनेने खळबळ; छेडछाडीवरून दोन गट भिडले; लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी
4

जळगावच्या लोंणजे गावातील घटनेने खळबळ; छेडछाडीवरून दोन गट भिडले; लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.