crime (फोटो सौजन्य: social media)
बारामतीमधील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात डंपर आणि दुचाकीच्या मधात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वडील आणि त्यांच्या दोन मुली यांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडली आणि तिघेही चेंगरले गेले. ही घटना 27 जुलै रोजी घडली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नावे वडील ओंकार आचार्य व त्यांच्या दोन मुलींचे नावे चार वर्षाची मधुरा आणि दहा वर्षाची सई आचार्य असे आहे. ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे ते वास्तव्यास होते. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालक ओंकार आचार्य यांचं पोटापासून खाली काहीच शिल्लक उरलं नव्हतं. आपल्या मुलीना रस्त्यावर पडलेलं पाहून हळहळलेल्या वडील ओंकार यांनी आपल्या दोन हातांवर जोर देत उठण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मुलींना तेवढं वाचवा असं म्हणत होते.
अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली-
बारामतीतील महात्मा फुले चौक येथे झालेल्या दुचाकी व मालवाहतूक करणाऱ्या डंपरच्या भीषण अपघातात, दोन चिमुरड्या मुलींचा व त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांच्या व आप्तजनांच्याप्रती सहसंवेदना व्यक्त करतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
बारामतीतील महात्मा फुले चौक येथे झालेल्या दुचाकी व मालवाहतूक करणाऱ्या डंपरच्या भीषण अपघातात, दोन चिमुरड्या मुलींचा व त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांच्या व आप्तजनांच्याप्रती…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 27, 2025
सुनेत्रा पवार यांनी वाहिली श्रद्धांजली-
बारामतीतील महात्मा फुले चौक येथे घडलेल्या भीषण अपघातात दोन निष्पाप चिमुरड्या मुली आणि त्यांच्या वडिलांचे निधन झाले ही अत्यंत हृदयद्रावक आणि वेदनादायी घटना आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करते व अपघातात जीव गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते! असं खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या.
बारामतीतील महात्मा फुले चौक येथे घडलेल्या भीषण अपघातात दोन निष्पाप चिमुरड्या मुली आणि त्यांच्या वडिलांचे निधन झाले ही अत्यंत हृदयद्रावक आणि वेदनादायी घटना आहे.
मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करते व अपघातात जीव गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.!— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) July 27, 2025
Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त
बारामती शहर व परिसरात ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि हायवा वाहनांवर अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि बारामती वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर यादव शहर पोलिस निरीक्षक विलास नाळे यांना सोबत घेऊन मोठी कारवाई करत एकूण १४ वाहने जप्त केली आहेत. या सर्व वाहनांवर खटले तयार करून ते प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांच्याकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती
चंद्रशेखर यादव यांनी दिली.
बारामती शहरातील खंडोबा नगर या ठिकाणी रविवारी झालेल्या भीषण अपघातात वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बारामती परिसरातील बेफिकीरपणे अवजड वाहने चालवणाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या संदर्भात समाज माध्यमांवर देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून या कारवाईचे स्वागत बारामती शहरातील नागरिकांनी केले आहे.