गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांनी सापळा रचून पकडले
काय नेमकं प्रकरण?
आरोपी दिवाकर गमे याने पीडित तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दिले होते. मात्र या आमिषाचा गैरफायदा घेत त्याने गेल्या पाच वर्षांपासून पीडितेचे शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू केले. एवढेच नाही तर आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिचा सातत्याने छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने धाडस दाखवत पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपीला अटक
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला सुरुवात केली. आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यातील विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. आता या प्रकरणात आणखी काय समोर येत या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता वर्ध्याच्या आर्वी येथील रहिवासी असलेल्या शेख शाहरुख शेख रऊफ याची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
आर्वी येथील शेख शाहरूख याची हत्या झाली. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी नियोजनबद्ध कट रचून हत्या करण्यात आली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी कुणालाही या घटनेची माहिती मिळू नये, या हेतूने अमरावती जिल्ह्यात मृतदेह नेत जाळून पुरावेही नष्ट केले. याप्रकरणी अमरावती जिल्ह्याच्या पथ्रोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा
Ans: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव परिसरात ही घटना उघडकीस आली.
Ans: दिवाकर गमे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थानिक नेता असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Ans: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण करणे आणि अश्लील संदेश पाठवून छळ केल्याचा आरोप आहे.






