Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: OTT सिरीज पाहून रचला खुनाचा कट; विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधातून प्रियकराने तिच्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. आरोपी धनेश मेंगाळ याने OTT वरील गुन्हेगारी मालिका पाहून खुनाचा कट रचल्याचे तपासात समोर आले. ठाणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 22, 2026 | 08:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • विवाहित प्रेयसीच्या पतीची हत्या केल्याप्रकरणी प्रियकराला अटक.
  • आरोपीने OTT वरील गुन्हेगारी मालिका पाहून हत्येचे नियोजन केल्याचा दावा.
  • ठाणे ग्रामीण पोलिसांकडून तांत्रिक तपासाद्वारे गुन्ह्याचा उलगडा.
ठाणे: ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात प्रेमसंबंधातून घडलेल्या एका हत्येचा ग्रामीण पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. विवाहित महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने प्रियकराने त्याचा खून करण्याचा कट रचला. विशेष म्हणजे, हत्या कशी करायची, पुरावे कसे नष्ट करायचे आणि पोलिसांपासून कसे वाचायचे याचे नियोजन आरोपीने OTT प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी मालिकांमधून शिकल्याचे तपासात समोर आल्याने या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खरपत क्रमांक 1 गावातील 52 वर्षीय वामन निरगुडा हे शेतात काम करत असतांना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना संशयास्पद वाटत होती. ठाणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. तपासादरम्यान धनेश मेंगाळ (३५ वर्ष) यानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे मृताच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. या नात्यात पती अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा निर्णय आरोपीने घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

आरोपीने OTT सिरीज पाहून आखला कट

पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. धनेश मेंगाळ याने हत्या करण्यापूर्वी अनेक दिवस OTT प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी मालिका पाहून गुन्ह्याचे बारकाईने नियोजन केले होते. हत्या कशी करायची, घटनास्थळी पुरावे कसे नष्ट करायचे, पोलिसांची दिशाभूल कशी करायची आणि गुन्ह्यानंतर संशयापासून कसे दूर राहायचे, याचा अभ्यास त्याने या मालिकांमधून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

तांत्रिक तपासातून आरोपी गजाआड

हत्येनंतर आरोपी काही काळ फरार झाला होता. मात्र, ठाणे ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन, गुप्त माहिती आणि इतर तपासाच्या आधारे त्याचा माग काढत अखेर त्याला अटक केली. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

परिसरात खळबळ

प्रेमसंबंधातून घडलेल्या या हत्येमुळे शहापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हा करण्यासाठी OTT वरील गुन्हेगारी मालिकांचा आधार घेतल्याचा हा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे ग्रामीण पोलीस करत आहेत.

भीषण अन् महाभयंकर! परत जातो म्हणून निघाला अन्…; नाणेघाटात ‘त्या’ युवकासोबत घडले तरी काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले?

    Ans: प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने.

  • Que: आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: धनेश मेंगाळ.

  • Que: पोलिसांनी आरोपीपर्यंत कसे पोहोचले?

    Ans: तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे.

Web Title: Thane crime conspiracy to murder after watching ott series married lovers husband killed lover arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
2

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
4

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.