
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
पीडित मुलीचे वडील याच बांधकाम साईटवर काम करतात. काही दिवसांपूर्वी तिची आई गावी गेल्याने घरात वडील आणि चार वर्षांची धाकटी बहीण असे तिघेच राहत होते. काल रात्री सात वर्षांची मुलगी एकटी असल्याची संधी साधत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्या साईटवर आला होता. त्याचा भाऊ आधीपासून त्या साईटवर काम करत होता.
Ashok Kharat case: दुनिया झुकती है…’; अशोक खरातचा कोठडीत ‘मेंटल गेम’!
आरोपी अटकेत
पोलिसांनी तत्परता दाखवत दोन ते तीन पथके रवाना केली आणि काही वेळातच आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. आरोपी बिहारमधून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे ठाणे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
विश्वासघाताची परिसीमा! खासगी बोलायचं आहे म्हणत हॉटेलमध्ये नेले; गुंगीचं औषध देत दोन वेळा अत्याचार
ठाणे येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. रुगालयातील नर्सवर वार्डबॉयने दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तुझ्याशी थोडं खासगी बोलायचं आहे, असे म्हणत नर्सला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. एका ४१ वर्षीय वार्डबॉयने हे कृत्य केले असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असे ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी सांगितले.
काय घडलं नेमकं?
पीडित नर्स आणि आरोपी वार्डबॉय दोघेही ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात नोकरीला आहेत. दोघेही एकमेकांचे चांगले परिचित होते. त्यामुळे तिचा विश्वास संपादन करून त्याने खासगी बोलायचे असल्याचे सांगत एका हॉटेलवर नेले होते. आरोपीने तिला आधी ठाण्यातील हॉटेल मौर्या येथे नेले. हॉटेलमधील एका रूममध्ये गेल्यानंतर गुंगी येणारा पदार्थ मिसळलेले ज्यूस त्याने तिला दिले. त्यांनतर नर्स बेशुद्ध झाली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला.
तो एवढ्यावरच थांबला नाही तर बदनामी करण्याची धमकी देत त्याने तिला सिग्नेचर हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथेही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर संशयित वॉर्डबॉयविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असे ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी सांगितले.
Nanded Crime:नांदेड हादरलं! मुलाने पेटत्या दुचाकीवर वडिलांना ढकलले; उपचारादरम्यान मृत्यू
Ans: ठाण्यातील एका कन्स्ट्रक्शन साईटवर.
Ans: मुलगी एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर अत्याचार केला.
Ans: तात्काळ पथके पाठवून आरोपीला अटक करण्यात आली.