
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव टिप्पन्ना असे आहे. ते कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यातील सिरुगुप्पा गावात राहत होते. टिप्पन्नाच्या पत्नीला त्याच्यापासून घटस्फोट हवा होता. मात्र याला तो तयार नव्हता. या नाकारामुळे ती संतापली आणि हत्येची योजना तिने आखली. या कटात तिने आपल्या भावाची आणि त्याच्या इतर २ साथीदारांची मदत घेतली. आरोपी महिलेचे हसिना मेहबूब शेख असे असून, तिच्या भावाचे नाव फैयाज जाकिर हुसैन शेख (35 वर्षीय) असे आहे. कटानुसार १७ नोव्हेम्बरला फैयाज त्याच्या साथीदारांसोबत मिळून पीडित टिप्पन्नाला घेऊन फिरायला गेला. आरोपी त्याला शहापूरजवळील एका निर्जन जंगलात घेऊन गेले आणि तिथेच त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर, आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित तरुणाचा मृतदेह पूर्णपणे जळला नाही. त्यानंतर, आरोपींनी तो मृतदेह हायवेच्या कडेला फेकून दिला.
२५ नोव्हेम्बरला मुंबई-नाशिक हायवेजवळ पोलिसांना एक अर्धवट जळालेला आणि कुजलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि तपासाला सुरवात केली. पोलिसांनी टेक्निकल सर्व्हिलांस आणि चौकशीतून आरोपींची ओळख पाठवली. पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. टिप्पन्ना आणि हसीना मेहबूब शेख हे दोघे एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्यानंतर हसीनला आपल्या पतीपासून घटस्फोट हवा होता. मात्र, टिप्पन्नाने घटस्फोट देण्यासाठी स्पष्ट नकार दिला आणि याच कारणामुळे पतीची निर्दयी हत्या केली.
गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपी पत्नी हसीना आणि तिच्या साथीदारांविरुद्ध IPC च्या कलम 103(1) (हत्या) आणि 238 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान, आरोपी फैयाजने त्याच्या बहिणीच्या सांगण्यावरून साथीदारांसोबत मिळून टिप्पन्नाची हत्या केल्याचं कबूल केलं. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
कपडे वाळवताना लेकीला विजेचा धक्का; वाचवण्यासाठी गेलेल्या बापालाही झटका, जागीच झाला मृत्यू
Ans: मुंबई-नाशिक हायवेजवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेत.
Ans: पत्नीला घटस्फोट हवा होता पण पतीने नकार दिला, त्यामुळे कट रचून हत्या केली.
Ans: पत्नी, तिचा भाऊ आणि दोन साथीदार असे चार जण अटकेत.