Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: देशात पुन्हा एकदा वातावरण बदलू लागलं आहे. ते पाहता मूळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची आहे, हे स्पष्ट होत आहे. बाकी सर्व ड्युप्लिकेट आहे. आता हा खेळ सुप्रीम कोर्ट संपवणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 09, 2026 | 02:16 PM
Sanjay Raut, Election Commission, Gyanesh Kumar,

Sanjay Raut, Election Commission, Gyanesh Kumar,

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार, फडणवीस व शिंदेंनी २०२४ च्या निवडणुकीत ‘कृत्रिम पराभव’ घडवल्याचा राऊतांचा आरोप
  • पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक दावा
  • मूळ शिवसेना ही बाळासाहेब व उद्धव ठाकरेंचीच; उर्वरित सर्व ‘ड्युप्लिकेट’ असल्याचा टोला
Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: एकीकडे देशभरात केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्याविरोधात रान पेटलं आहे. एसआयआर प्रक्रियेतील घोळ आणि फॉर्म ६ मधील भ्रष्टाचाराच्या मु्द्द्यावरून त्यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. विरोधी इंडिया आघाडीसह सीजेपीने त्यांच्याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. असे असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

ज्ञानेश कुमार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्रिकुटाने 2024 च्या विधानसभा (2024 Assembly Election) निवडणुकीत आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला. ही निवडणूक शिवसेनेने जिंकली असल्याचे आता लोकांनाही पटू लागलं आहे. असा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन;  

संजय राऊत म्हणाले, देशात पुन्हा एकदा वातावरण बदलू लागलं आहे. ते पाहता मूळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची आहे, हे स्पष्ट होत आहे. बाकी सर्व ड्युप्लिकेट आहे. आता हा खेळ सुप्रीम कोर्ट संपवणार आहे. मागील सुनावणीवेळी निवडणूक आयोग आणि तेव्हाच्या सर्वोच्च न्यायालयाने जी पापं केली, त्यामुळेच आयोगाविरोधात देशात संताप उसळलाय असा दावाही संजय राऊतांनी केला.

2024 मध्येही विधानसभेत शिवसेनाच जिंकली होती. पण देशात भाजप कसा जिंकला? हे मिंधे, फडणवीस आणि ज्ञानेश कुमार यांचे कारनामे आता समोर आले आहेत. यांच्या अशा कारनाम्यांमुळेच आमचा पराभव घडवून आणला गेला. असा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला. ज्ञानेश कु्मारांचा निकाल लावला आणि जर ताबडतोब निवडणूक झाल्या तर मिंधे गट आणि भाजपला औषधालाही राहणार नाही, अशी टिका संजय राऊत यांनी केली आहे.

फडणवीस, शिंदे का बोलत नाहीत?

जनतेच्या प्रश्नावर फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार बोलायला तयार नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिवसाआड दिल्लीच्या दौऱ्यावर असतात. राज्यात जमिनीवर फक्त शिवसेनेचं काम सुरू आहे. असंही त्यांनी नमुद केलं.

Railways Cancel Express Trains: केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक! सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्लीकडे जाणाऱ्या

“ज्ञानेश कुमार भुमिगत अन् भ्रष्ट”:

संजय राऊत म्हणाले की, “ज्ञानेश कुमार एक नंबरचे भ्रष्ट आणि घोटाळेबाज माणूस आहेत. ते सध्या कुठे पळून गेलेत? फरार आहेत का. SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा झालाय हे आम्ही आधीपासून सांगत होतो, पण आयोगातील इतर दोन निवडणूक आयुक्तांनीही या निर्णयावर असहमती दर्शवल्याने आता हा विषय संपूर्ण देशात पेटला आहे.”

“तुम्ही निवडणूक आयोगाचे वकील आहात का?”:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या आरोपांवर केलेल्या भाश्याचा समाचार घेताना राऊत म्हणाले, “भाजपाला ज्ञानेश कुमारांचा एवढा पुळका का आला आहे? देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक आयोगाचा वकील म्हणून नेमले आहे का? निवडणूक आयोग जर घटनात्मक संस्था असेल, तर त्यांना त्यांची बाजू मांडू द्या.”

SIR च्या नावाखाली मतदारांची नावे वगळल्याचा गंभीर आरोप:

“SIR प्रक्रियेत मृत मतदारांची नावे काढण्याला आमचा विरोध नाही, पण जिथे शिवसेनेला मतदान जास्त होते तिथे नावे वगळायची किंवा पश्चिम बंगालमध्ये एका विशिष्ट समुदायाची नावे काढून त्यांना मतदानापासून वंचित ठेवायचे, याला SIR धोरण म्हणत नाहीत. हा थेट लोकशाहीवर दरोडा आहे,” असा आरोप त्यांनी केला

 

Web Title: Sanjay raut alleges gyanesh kumar fadnavis and shinde orchestrated artificial defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Election Commission
  • Gyanesh Kumar
  • sanjay raut
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

SIR वरून देशात राजकीय रणकंदन; मात्र 42 निवृत्त न्यायमूर्ती-अधिकाऱ्यांचा ज्ञानेश कुमारांना खुलं समर्थन, विरोधी पक्षांना सुनावलं
2

SIR वरून देशात राजकीय रणकंदन; मात्र 42 निवृत्त न्यायमूर्ती-अधिकाऱ्यांचा ज्ञानेश कुमारांना खुलं समर्थन, विरोधी पक्षांना सुनावलं

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी
3

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक
4

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.