Raj Thackeray on Mahayuti: १५०० रुपये १५ दिवसांत संपतात..; राज ठाकरेंची लाडकी महिलांना योजनेवर टिका
ठाण्याच्या माजी महापौर आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्या मीनाक्षी शिंदे सध्या महापालिका निवडणूक लढवत आहेत. मात्र प्रचारादरम्यान त्यांच्या वार्डात वाद निर्माण झाला असून, त्यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये प्रचारासाठी काही कार्यकर्ते उपस्थित नसल्यामुळे मीनाक्षी शिंदे संतप्त झाल्याचे ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. (Eknath Shinde News)
व्हायरल ऑडिओमध्ये त्या एका कार्यकर्त्याला सुनावताना दिसतात. “तुमच्यात दम नाही तर काम कशाला करायचं? मी आज पोरं पाठवली तर त्यांची इज्जत काय राहील?” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच “तूही प्रचाराला येत नाहीस. तुमच्या बायका पळवून नेल्या का माझ्या नवऱ्याने म्हणून हे लोक सॅड झाले आहेत?” असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे तर “त्याच्या आई-बहिणीला फोन कर, घरात बायका पाठवून मारायला लावेन,” अशी धमकी दिल्याचेही ऐकू येत असल्याचा दावा आहे.
पुढील संभाषणात आनंद भोईर नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत शिवीगाळ, बदनामीकारक आरोप आणि मारहाणीच्या धमक्या दिल्याचेही सांगितले जात आहे. “त्याला रस्त्यावर आणून मारेन, निवडणुकीनंतर बघून घेईन,” तसेच आगरी समाजाविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप या ऑडिओ क्लिपवरून केला जात आहे. शिवाजीनगरमधील घरांपासून पोलीस कारवाईपर्यंत धमकीचे उल्लेख या संभाषणात असल्याचेही व्हायरल क्लिपमध्ये ऐकू येत असल्याचा दावा आहे.
मात्र, या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी नवराष्ट्र (Navarashtra) मराठी करत नाही. दरम्यान, या प्रकरणावर मीनाक्षी शिंदे स्वतः समोर आल्या असून त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “ही माझी ऑडिओ क्लिप नाही. एआयच्या माध्यमातून माझ्या नावाने दोन ऑडिओ क्लिप तयार करून त्या व्हायरल करण्यात आल्या आहेत,” असा दावा त्यांनी केला आहे.
विरोधकांकडून जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला असून, निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानेच आपल्याविरोधात हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी आपण पोलीस तक्रार दाखल केली असून, कायदेशीर मार्गाने सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.






