crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
ठाणे: ठाणे शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका नवनिर्मित इमारतीच्या 7व्या मजल्यावरून पडून एका स्टोअर मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ढोकाळी परिसरातील हायलँड पार्कमधील बिल्डिंग नंबर 2 येथे घडलीअसून दुपारी 2.35 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीचे बांधकाम सुरु होते.
गैरहजेरी लपवून हजेरीपटावर खोट्या सह्या! न्यायालयाने शिक्षकावर ठोठावला दंड
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव सचिन वसंत गुंडेकर (49) रा. श्रीकृपा सोसायटी नंबर 1, सर्वोदया नगर, गव्हाणी पाडा, नाहूर रोड मुलुंड असे आहे. नवनिर्मित इमारतीच्या 7व्या मजल्यावरून तोल गेला आणि थेट तळ मजल्यावरती असलेल्या लोखंडी रॉड आणि दोरखंडमध्ये अडकले आढळले. गुंडेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सचिन गुंडेकर हे सिद्धी ग्रुप इंटरप्राईजेस या कंपनीचे स्टोअर मॅनेजर म्हणून काम करीत असल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बाळकुम अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी, कापूरबावडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका दाखल होऊन झाले.
मृतकाला व्यक्तीला अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत असून गुंडेकर यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी सिव्हिल रुग्णालय, ठाणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. पुढील कारवाई पोलीस करत असून हे खरच दुर्घटना होती कि घातपात याचा देखील तपास करत आहे.
गणपती दर्शनासाठी गुजरातला गेलेला तरुण ठरला अपहरणाचा बळी
डोंबिवलीहून वांगणीत वास्तव्यास आलेल्या महिलेचा मुलगा 1 सप्टेंबर रोजी गणपती दर्शनासाठी गुजरातला गेला होता. या दरम्यान तीन जणांनी त्याचे अपहरण करून त्याच्या आईकडे तब्बल १२ लाख रुपयांची खंडणी मागितीली. महिलेने तात्काळ बदलापूर ग्रामीण पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मोबाईल सीसीआरच्या आधारे आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. गुजरात पोलिसांच्या सहकार्याने बदलापूर पोलिसांची टीम त्या ठिकाणी रवाना झाली. पोलिसांनी तपासात तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींची ओळख अनिल खैर, नरेश खैर आणि लक्ष्मण खैर अशी झाली. यातील अनिल आणि नरेश हे सख्खे भाऊ असल्याचे तपासात समोर आले.
आरोपीने मुलाला सोडून दिल्याचे सांगत होते, मात्र त्यांनी मोबाईल सिमकार्ड बदलल्यामुळे मुलाचा शोध घेणे कठीण झाले होते. परंतु पोलिसांनी IMEI या नंबरच्या मदतीने मुलाला ठावठिकाणा शोधून त्याला सुरक्षितरीत्या आईच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारभारामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
Crime News: मोठी बातमी! शिरूरमध्ये आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल; कारण वाचून म्हणाल…