
Mumbra Drug Seizure: आकाशात नाही, थेट मुंब्र्यातील फ्लॅटमध्ये काळाबाजार! परदेशी नागरिक जाळ्यात; दीड कोटींचे ड्रग्स जप्त!
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सम्राट नगरमधील हरीओम बिल्डिंगमध्ये काही परदेशी नागरिक अंमली पदार्थांचा साठा बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले, ज्यामध्ये ३ जण टांझानिया देशाचे तर १ जण नायजेरियन नागरिक आहे. अंगझडती आणि घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल दीड किलो एमडी (मेफेड्रोन) ड्रग सापडले. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत सुमारे १ कोटी ५० लाख रुपये असून, मोबाईल फोन व कागदपत्रांसह एकूण मुद्देमाल १ कोटी ५० लाख २५ हजार रुपयांचा आहे.
पकडलेले परदेशी नागरिक भारतात कधीपासून आले? कोणत्या व्हिसावर आले? त्यांच्या व्हिसा आणि पासपोर्टची मुदत संपली आहे का? यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का? या सर्व बाजूंचा कसून तपास सुरू आहे. तसेच, त्यांना राहण्यासाठी कोणी परवानगी (Live-in Licence) दिली आणि घराचा खरा मालक कोण आहे, याचाही शोध घेतला जात आहे. हे ड्रग्स ते कुठून आणायचे आणि पुढे कोणाला पुरवणार होते, या संपूर्ण ‘बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज’चा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस तांत्रिक आणि मानवी गुप्त माहितीचा (Technical & Human Intelligence) वापर करत आहेत.
केवळ तस्करांवरच नव्हे, तर ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांवरही ठाणे पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.
अमलबजावणीसोबतच शाळा, महाविद्याले आणि सामान्य नागरिकांमध्ये अंमली पदार्थांचे धोके समजावून सांगण्यासाठी जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे.
याशिवाय, मुंब्रा परिसरातील इराणी वस्तीमध्ये गांजाची विक्री व साठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सव्वा किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा ओडिशा आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमधून बाहेरून मागवला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, त्याचे स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. (ही संपूर्ण कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालयाने स्वतंत्रपणे पार पाडली असून यात नवी मुंबई पोलिसांचा सहभाग नव्हता.)
Ans: ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत मुंब्रा पोलिसांनी केली असून यात नवी मुंबई पोलिसांचा संबंध नाही.
Ans: मुंब्र्यातील सम्राट नगरमध्ये टाकलेल्या छाप्यात सुमारे १ कोटी ५० लाख २५ हजार रुपये किमतीचे १.५ किलो एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स जप्त झाले.
Ans: यामध्ये ३ टांझानियन आणि १ नायजेरियन अशा एकूण ४ परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.