crime (फोटो सौजन्य: social media)
ठाणे: राज्यता गुन्हेगारीच्या घटना वाढत चालले आहे. ठाण्यातून हत्येची एक घटना समोर आली आहे. गावात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. २९ मे रोजी गावातील जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शीर नसलेल्या अवस्थेत आढळला होता. पीडित तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियासह व्हाट्सअप ग्रुप वर मोठया प्रमाणावर फिरत होता. या घटनेच्या तापसांतर्गत आरोपी २५ वर्षीय सलमान मोहम्मद गौरी अन्सारी या तरुणाला अटक केली आहे.
HIT AND RUN: मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
काय आहे प्रकरण?
फैजल मोहम्मद गौरी अन्सारी या 29 वर्षीय असे मृतकाचे नाव आहे. २९ मे रोजी गावातील जंगल परिसरात एका अज्ञान व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलीस पथकाने केलेल्या तपासानुसार सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. पोलीस ठाण्यामधील बेपत्ता व्यक्तींच्या अहवालाशी ही फुटेज जुळवण्यात आले. पीडित व्यक्तीचा फोटो तोपर्यंत व्हाट्सअप ग्रुप वरही मोठ्या प्रमाणात फिरत होता.तपास पथकाने घटनास्थळाजवळ असणारी एक अज्ञात कार ओळखली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपी टिटवाळा येथे मांडा भागातील रहिवासी होता.आरोपीने त्याचा सावत्र भाऊ फैजल याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.दोन्ही भाऊ अनेकदा मालमत्तेवरून भांडत असत.या वादातूनच सलमान मोहम्मद गौरी अन्सारी याने फैजलची हत्या केली असल्याचा समोर आलं आहे.पोलिसांनी आरोपी 25 वर्षीय सलमान मोहम्मद गौरी अन्सारी यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक केली आहे.
जळगाव हादरलं! पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला;कुटुंबाचा खून झाल्याचा आरोप
जळगाव: जळगावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावात पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. मृत तरुणाचं नाव १९ वर्षीय साहिल शब्बीर तडवी असं आहे. या तरुणाचा घातपात झाला आहे. त्याची हत्या करण्यात आली आहे, असा संशय साहिल तडवीच्या कुटुंबाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मृत तरुणाच्या कुटुंबियांसह समाजबांधवांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल आहे. लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत साहिल ताडवीच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.
Dharashiv Crime: पवनचक्की वाद चिघळला: शेतकऱ्यांवर आणि नगरसेवकावर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज