पवनचक्की वाद चिघळला: शेतकऱ्यांवर आणि नगरसेवकावर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात पवनचक्की वादातून एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तांदुळवाडी येथील पववचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा (जमीनीचा वाढीव मोबदला) देऊन काम करा अन्यथा काम थांबवा, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती. पण काम थांबवा असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवरच पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्याया लाठीचार्जमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकालाही अमानुष लाठीमार करण्यात आला आहे. पोलिसांच्याया मारहाणची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर संभाव्य धोका टाळण्यासाठी लाठीचार्ज करावा लागल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिनुसार, वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईचे दोन टॉवर गेले आहेत. त्यातील एका कंपनीकडून जेवढा मावेजा मिळाला आहे तितकाच दुसऱ्या कंपनीकडूनही मिळावा, अशी अपेक्षा शेरकर यांनी केली होती. त्यामुळे त्यांनी शेतात सुरू असलेले विद्युत लाईनचे कामही थांबवले होते. मात्र पवनचक्की अकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी पोलिसांना बोलावून शेतकऱ्यांना दमदाटी आणि धमकावणे सुरू केले. यावेळी भाजप नगरसेवक राजू कवडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी शेतकरी आणि राजू कवडे यांच्यावरही अमानूष लाठीमार केला. भाजप नगरसेवक ज्वलनशील पदार्थ घेऊन आलेहोते. त्यामुळे नाईलाजाने गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला, असे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.
‘राज्य सरकार दिलेला प्रत्येक शब्द पाळणार’; शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
धाराशिवचे पोलीस उप-अधीक्षक (डीवायएसपी) स्वप्निल राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू कवडे या व्यक्तीने सुमारे ५ ते ६ लिटर डिझेल असलेला ड्रम घेऊन गर्दीत स्वतःच्या व इतरांच्या अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये व संभाव्य धोका टाळावा, या उद्देशाने पोलिसांनी तत्काळ लाठीचार्ज केला.डिझेलसारख्या ज्वलनशील द्रव्याचा सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे वापर केल्यास मोठा अपघात घडू शकतो. पोलिसांनी केवळ गर्दीचे नियंत्रण आणि जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
जळालेल्या नोटांनी वाढवल्या न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या अडचणी; बचाव पक्षाचा युक्तिवाद लावला फेटाळून