
Thane News, Crime News, Shiv Sena UBT, Pradeep Purnekar
पण या घटनेनंतर ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रदीप पूर्णेकर हे माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे बंधू आणि मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर विभागाचे ठाकरे गटाचे विभागप्रमुख होते.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपाण्यासह इतर बाजूंनीदेखील तपास सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेहऱ्यावर रुमाल बांधलेले दोन जण दुचाकीवरून परिसरात जाताना दिसत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. क्राईम ब्रँचसह पोलिसांची पथके तपासासाठी तैनात करण्यात आली आहेत. पण प्रदीप पूर्णेकर यांच्यावरील हल्ल्याचे नेमके कारण, त्या मागचा सुत्रधार कोण, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दुसरीकडे प्रदीप पूर्णेकर यांची हत्या कट रचून करण्यात आल्याचा आरोर त्यांच्य कुटुंबीयांनी केला आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी धमकी दिल्याचा आरोप केला. राजेंद्र शिंदे यांनी बैठक घेऊन हा प्रकार घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
Breaking News : ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार
पूर्णेकर यांचे मोठे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनीही हल्ल्यापूर्वी रेकी केली जात असल्याचा दावा केला आहे. गणपती उत्सवापासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.
प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामागे नेमके कारण काय, हल्लेखोर कोण होते आणि या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या तपासातून या हत्येमागील कारण आणि आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पूर्णेकर यांच्या हत्येने ठाण्यातील स्थानिक राजकीय वातावरणातही मोठी खळबळ उडाली आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे हल्ल्याचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.