लोहियानगरमध्ये तरुणाच्या खूनाचा प्रयत्न; परिसरात दहशत देखील माजवली
पुणे : जुन्या वादातून तसेच परिसरात भाईगिरीवरून टोळक्याने तरुणावर जीवे घेणा हल्ला करून भागात दहशत माजवली. त्यानंतर जाब विचारण्यास गेलेल्यांना देखील शिवीगाळ केल्याचा प्रकार लोहियानगर परिसरात घडला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी पवन सुनिल खवळे (वय ३०), शुभम सुनिल खवळे (वय २८), रोहन नवनाथ जाधव (वय १९) व नवनाथ छगन जाधव (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याघटनेत ओम कांबळे (वय २४) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विकास, जखमी ओम आणि त्यांचा एक मित्र असे तिघे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी जात होते. तेव्हा अटक आरोपी तसेच त्याचे इतर साथीदार एकबोटे कॉलनी परिसरात आले व त्यांनी दुचाकी अडवून तक्रारदारांना शिवीगाळ केली. त्यांना संपवून टाका असे म्हणत लोखंडी हत्याराने ओम याच्यावर हल्ला केला. या हल्यात तो गंभीर जखमी झाला. नंतर विकास कांबळे याच्यावर लाकडी दांडक्याने देखील मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजवण्यासाठी परिसरात कोयते हवेत फिरवून चांगलाच गोंधळ घातला. पुढील तपास पोलीस करत आहेत.