Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल

शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 22, 2026 | 12:56 PM
कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल

कृषी विभागाचा दणका, खत विक्रीचे 107 परवाने निलंबित; तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल

Follow Us
Follow Us:

कृषी विभागाचा मोठा दणका

खत विक्रीचे 107 परवाने निलंबित

तब्बल 7 केंद्रांवर गुन्हे दाखल

पुणे : एक मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात एप्रिल २०२६ पर्यंत मोठी कारवाई करण्यात आली असून, १०७ खत विक्री परवाने निलंबित, ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच ७ विक्री केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली.

 

या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात एकूण २ हजार ५७६ परवानाधारक केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २८१ प्रकरणांमध्ये अनियमितता आढळून आली असून, २७७ केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात ६५० केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७१ प्रकरणांत अनियमितता आढळून आली असून, २७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात ८१२ केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर १६ परवाने निलंबित, २ परवाने रद्द करण्यात आले असून, ३ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार १२९ केंद्रांची तपासणी करण्यात आली. १८ प्रकरणांमध्ये खतांचे नमुने निकृष्ट आढळून आले. जिल्ह्यात ६४ परवाने निलंबित करण्यात आले असून, ४ परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच ४ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : मध्यरात्री सराईत गुन्हेगार अन् पोलिसांत थरार, पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने वार; नेमकं काय घडलं?

अनुदानित युरियाच्या गैरवापरावरही कारवाई

अनुदानित युरियाचा औद्योगिक वापर रोखण्यासाठी विभागातील ४२ औद्योगिक युनिट्सना भेटी देण्यात आल्या आहेत. खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा जेजुरकर यांनी दिला. कारवाईदरम्यान पुणे अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, तंत्र अधिकारी नीलेश गढरी, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा दोन तासात लावला छडा; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Web Title: The agriculture department has taken major action against fertilizer dealers who violated regulations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Agriculture News
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

Dombivli Rasrang Dandiya 2026: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; यंदाचा ‘रासरंग दांडिया’ रद्द
1

Dombivli Rasrang Dandiya 2026: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; यंदाचा ‘रासरंग दांडिया’ रद्द

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
3

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
4

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.