Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

सन २०२१ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकीच्या गुन्ह्यात न्यायालयीन प्रक्रियेला सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या वॉरंटधारक आरोपीला बारामती शहर पोलिसांनी अखेर कसबा परिसरातून अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2026 | 12:17 PM
पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

बारामती : सन २०२१ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकीच्या गुन्ह्यात न्यायालयीन प्रक्रियेला सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या वॉरंटधारक आरोपीला बारामती शहर पोलिसांनी अखेर कसबा परिसरातून अटक केली आहे. देवेंद्र रामचंद्र घोडके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४२/२०२१ नुसार भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०४, ५०६ व ३४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आरोपी न्यायालयीन प्रक्रियेस नियमित उपस्थित राहत नसल्याने त्याच्याविरुद्ध वेळोवेळी समन्स व अटक वॉरंट बजावण्यात आले होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ८ ऑक्टोबर २०२१ रोजी खंडोबानगर परिसरात रस्त्यावर ठेवलेला लोखंडी रॅक बाजूला करण्यावरून वाद झाला होता. या वादातून आरोपीने कुकरने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शिवीगाळ व धमकी देत लोखंडी कोयता घेऊन फिर्यादीच्या दिशेने धावून आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. प्रलंबित वॉरंटच्या बजावणीसाठी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी व पोलीस हवालदार उदय टापरे यांनी सातत्याने आरोपीचा शोध घेतला. आरोपी कसबा परिसरातून जाणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. “न्यायालयीन समन्स व वॉरंटचा आदर करून संबंधितांनी न्यायालयीन प्रक्रियेस उपस्थित राहावे. वॉरंट टाळून कायद्यापासून सुटका होणार नाही,” असा स्पष्ट संदेश बारामती शहर पोलिसांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा : पाषाण येथील मुख्य बसथांब्याच्या दुरावस्थेवरुन मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा

वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

‘मावशी, साप आला!’ असे सांगून वृद्ध महिलेला घाबरवत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या टोळीतील एका आरोपीला यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत, तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना दौंड तालुक्यातील दापोडी येथे घडली आहे.

Web Title: The baramati city police have arrested the accused against whom a warrant had been issued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ
1

शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?
2

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ
3

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
4

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.