Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : मुंबईतील ताज हाॅटेलला उडवण्याची धमकी नक्की कुणी दिली? दाऊद इब्राहिमशी जोडलं जातंय नाव…

Taj Mahal Bomb Blast Threat : मुंबईतील प्रतिष्ठीत ताज हाॅटेलला बाॅम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. फोन करणाऱ्या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचे नाव घेतल्याने पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 14, 2026 | 10:05 AM
Mumbai News : मुंबईतील ताज हाॅटेलला उडवण्याची धमकी नक्की कुणी दिली? दाऊद इब्राहिमशी जोडलं जातंय नाव...

Mumbai News : मुंबईतील ताज हाॅटेलला उडवण्याची धमकी नक्की कुणी दिली? दाऊद इब्राहिमशी जोडलं जातंय नाव...

Follow Us
Follow Us:
  • सुरक्षा यंत्रणांनी तातडीने संपूर्ण परिसरात सखोल तपासणी मोहीम राबवली.
  • प्राथमिक तपासानंतर प्रकरणात महत्त्वाची तांत्रिक माहिती समोर आली.
  • संबंधित व्यक्तीचा शोध सुरू असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे.
ताज हाॅटेलला बाॅम्बने उडवण्याची धमकी मिळताच मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. सूचना मिळताच हाॅटेलची सुरक्षा व्यवस्था तत्काळ वाढवण्यात आली आणि परिसरात मोठी शोधमोहिम सुरु करण्यात आली. अनेक तास तपास केल्यानंतरही हाॅटेलमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नाहीत. प्राथमिक तपासात ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले असून धमकी करणाऱ्याने याचे कनेक्शन दाऊद इब्राहिमसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ulhasnagar Crime: धडक दिली… कार मागे घेतली… आणि जखमीच्या अंगावरून पुन्हा घातली; उल्हासनगरातील घटना हादरवणारी

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार-रविवारच्या रात्री साधारण १२.१३ वाजताच्या सुमारास नवी मुंबईतील पोलिस कंट्रोल रुममध्ये एक फोन काॅल आला. या काॅलनुसार दाऊदने ताज हाॅटेलमध्ये बाॅम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. घटनेची गंभीरता लक्षात घेत नवी मुंबई पोलिसांनी तत्काळ ही माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कळवली. सूचना मिळताच, कुलाबा पोलीस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक व निवारण पथकाची (बीडीडीएस) पथके लगेचच ताज हाॅटेलमध्ये दाखल झाले. सुरक्षा यंत्रणांनी हाॅटेलची मुख्य लाॅबी, स्विमिंग पूल, विभिन्न हाॅल, रेस्टाॅरंट, पार्किंग, बाहेरील परिसर आणि हाॅटेलमधील संवेदनशील ठिकाणी बारकाईने तपासणी केली.

सर्च ऑपरेशनमध्ये काहीही हाती लागले नाही

दिर्घ काळापर्यंत सखोल तपास केल्यानंतरही मुंबई पोलिस आणि तपास यंत्रणांना ताजमहालमधून कोणतीही संशयास्पद गोष्ट किंवा स्फोटके सापडली नाहीत. यानंतर पोलिसांनी सुरुवातील ही धमकी खोटी आहे असे सांगितले. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तांत्रिक तपासात हे स्पष्ट झालं आहे की, धमकीचा फोन काॅल हा नवी मुंबईतील तुर्भे इथून आला होता. पोलिसांनी ज्या मोबाईल नंबरवरुन काॅल आला होता त्या नंबरला ट्रेस केलं असून फोन काॅल करणाऱ्याला अटक करण्यासाठी शोधमोहिम सुरु आहे.

Jalgaon Crime: लग्नाला अवघे 6 दिवस… हातावरची मेहंदी अजूनही तशीच होती; माहेरी निघालेल्या नववधूला काळाने गाठलं!

फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु

मुंबई पोलिसांनी सांगितले की, खोटा फोन करणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी शोधमोहिम सुरु असून यासाठी तुर्भे पोलिसांची मदत घेतली जात आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे आणि काॅल करणाऱ्या व्यक्तीवर लवकरच कायदेशीर कारवाई देखील होणार आहे. अशा धमकीच्या फोन काॅल्समुळे पोलिस तत्काळ सतर्क होतात आणि लोकांच्या सुरक्षेसाठी लगेचच पोलिस पथक तैनात करुन त्यावर वेळीच कारवाई केली जाते. आरोपीला अटक झाल्यानंतर त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर संबंधित कायद्यांतील लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

Web Title: Taj mahal palace hotel mumbai bomb threat hoax dawood ibrahim name used police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • crime news
  • dawood ibrahim
  • Taj Hotel

संबंधित बातम्या

पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात, शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
1

पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात, शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

बनावट पदव्यांचा मास्टरमाईंड ताब्यात, नागपूर येथून केली अटक; महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता
2

बनावट पदव्यांचा मास्टरमाईंड ताब्यात, नागपूर येथून केली अटक; महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता

Accident in Pimpri : ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला जोरदार धडक; वृद्धाचा मृत्यू, चालक गंभीर
3

Accident in Pimpri : ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला जोरदार धडक; वृद्धाचा मृत्यू, चालक गंभीर

जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, आईने आरडाओरड केली पण…; नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ
4

जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, आईने आरडाओरड केली पण…; नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.