Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

दुकानावरून बिस्कीट पुडा आणण्याकरता गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने पकडून घरात नेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ३ वर्ष सश्रम करावास व १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2026 | 02:55 PM
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Follow Us:

गंगाखेड : दुकानावरून बिस्कीट पुडा आणण्याकरता गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने पकडून घरात नेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ३ वर्ष सश्रम करावास व १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गंगाखेडचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश २ व्ही.एम. सुंदाळे यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले. दिनांक ११ सप्टेंबर रोजी बाल लैंगीक अत्याचार कायद्या अंतर्गत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ३ वर्ष सश्रम करावास १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड पोलिस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुलगी दुकानावरून बिस्कीट पुडा घेऊन येताना आरोपीने बळजबरीने पकडून आपल्या घरात नेऊन तिचा विनयभंग केला. घडलेली घटना मुलीने आपल्या आईला सांगितली. मुलीच्या आईने दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून ओंकार उर्फ दाद्या गोपाळराव सकट या आरोपीविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात बाल लैंगीक अत्याचार कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गंगाखेड पोलिसांच्या जलद तपासाला यश

सदरील घटनेचा जलद गतीने तपास करून अवघ्या १५ दिवसांमध्ये तपासाची चक्रे फिरवत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. इंगळे यांनी तपास करून अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाखेड यांच्या न्यायालयात प्रकरण चालविले.

हे सुद्धा वाचा : जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

सरकारी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासले

पीडितेची आई व जन्म नोंदणी पुरावा आणि तपासिक अंमलदार यांची साक्ष गृहीत धरून बाललैंगीक अत्याचार कायद्याअंतर्गत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने ३ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सदरील प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता डी.यू. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.बी. पौळ यांनी बाजू मांडत पीडितेला जलदगतीने न्याय मिळवून दिला. याप्रकरणी सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.डी. वाकोडकर तसेच गंगाखेड पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरविकार महिला पोलीस शिपाई एस.एस. जिंकलवाड, जे.एच. पठाण, कोर्ट पैरवीकार एम.डी. कुंडगीर, महिला पोलीस हवालदार एल.व्हि. मुंडे यांनी काम पाहिले.

Web Title: The court has handed down a severe sentence to the accused in the case involving the molestation of a minor girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • nanded news

संबंधित बातम्या

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
1

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
2

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का
3

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

धक्कादायक ! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार; डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री झाली अन् हॉटेलमध्ये नेत…
4

धक्कादायक ! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार; डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री झाली अन् हॉटेलमध्ये नेत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.