Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणाची चाकूने भोसकून निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला अप्पर सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी हा निकाल दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 04, 2026 | 12:26 PM
जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Follow Us:

मालेगाव : जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणाची चाकूने भोसकून निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला अप्पर सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी हा निकाल दिला आहे. शेख रहीम शेख रज्जाक उर्फ रहीम भजिया (वय ३५) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेपेसह दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर या खटल्यातील दुसरा आरोपी शेख सलीम शेख याकुब उर्फ सलीम चमडा याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 

ही घटना २१ एप्रिल २०२१ रोजी कमालपुरा भागातील भिकू चौकाजवळ घडली होती. फिर्यादी इम्तियाज खान अमन उल्ला खान यांचा भाऊ फैसल खान याच्याशी आरोपी रहीम भजिया याने जुन्या वादावरून हुज्जत घातली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी रहीम भजिया, त्याचा भाऊ मजीद भजिया आणि मित्र सलीम चमडा यांनी फैसल खान याला गाठले. आरोपींनी फैसलवर धारदार चाकूने पोटावर गंभीर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात फैसलच्या आतड्या बाहेर येऊन तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शीनी मदतीसाठी धाव घेतली असता आरोपी त्यांच्यावरही धावून गेले. उपस्थितांनी रहीम भजिया याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी तेथून पसार झाले. गंभीर जखमी फैसलला तातडीने नूर हॉस्पिटल आणि त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सुनावणीदरम्यान संशयिताचा मृत्यू

याप्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरुन मालेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपी मजीद भजिया याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा : १२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

यांनी पाहिले खटल्याचे काम 

सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांच्या न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षातर्फे ज्येष्ठ अतिरिक्त सरकारी वकील अॅड. संजय कौतिकराव सोनवणे यांनी एकूण १० महत्त्वाचे साक्षीदार तपासले. त्यांनी मांडलेला सबळ युक्तीवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रहीम भजिया याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार मुकुंद परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: The court has handed down a severe sentence to the accused in the case involving the murder of a young man nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
1

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू
2

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…
3

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद
4

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.